दलित, मुस्लीम बांधवांचा एल्गार

By Admin | Updated: December 17, 2015 03:22 IST2015-12-17T03:22:25+5:302015-12-17T03:22:25+5:30

बुधवारी दलित, मुस्लिम व पारधी समाज बांधवांसह एकूण १४ मोर्चांनी विधानभवनावर धडक दिली.

Dalit, Muslim Brothers Elgar | दलित, मुस्लीम बांधवांचा एल्गार

दलित, मुस्लीम बांधवांचा एल्गार

संगणक परिचालकांचा मोर्चा ठाण मांडून : सर्वत्र तणावपूर्ण वातावरण
नागपूर : बुधवारी दलित, मुस्लिम व पारधी समाज बांधवांसह एकूण १४ मोर्चांनी विधानभवनावर धडक दिली. यात बहुजन आधार संघ, महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना, नंदनवन झोपडपट्टी कृती समिती, विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, आदिवासी पारधी समाज संघटना, आंबेडकरवादी संघर्ष पार्टी, आंबेडकरी विचार मोर्चा, मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती, अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस, सर्व शिक्षा अभियान कृती समिती, राज्यस्तरीय वन कामगार मोलमजूर कर्मचारी संघटना, मानवी हक्क अभियान व मजदूर युनियन नागपूर शहर समितीच्या मोर्चाचा समावेश होता. मात्र या सर्व मोर्चादरम्यान सकाळी संगणक परिचालकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याचीच सर्वत्र चर्चा रंगली होती. या घटनेमुळे दिवसभर मोर्चास्थळी तणावपूर्ण वातावरण होते. पोलीस यंत्रणेने आपले सर्व लक्ष संगणक परिचालकांच्या मोर्चाकडे केंद्रित केले होते. रात्री उशिरापर्यंत संगणक परिचालकांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघालेला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही सर्व मोर्चेकरी रात्री उशिरापर्यंत टेकडी रोडवर ठाण मांडून बसले होते.

Web Title: Dalit, Muslim Brothers Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.