डाेलामाईट फॅक्टरी आवारात चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:07 IST2021-06-05T04:07:08+5:302021-06-05T04:07:08+5:30

देवलापार : चाेरट्याने डाेलामाईट फॅक्टरीच्या आवारातील स्टाेअर रूममध्ये प्रवेश केला आणि तेथील मशीनचे सुटे भाग चाेरून नेले. त्या साहित्याची ...

Dalamite factory premises | डाेलामाईट फॅक्टरी आवारात चाेरी

डाेलामाईट फॅक्टरी आवारात चाेरी

देवलापार : चाेरट्याने डाेलामाईट फॅक्टरीच्या आवारातील स्टाेअर रूममध्ये प्रवेश केला आणि तेथील मशीनचे सुटे भाग चाेरून नेले. त्या साहित्याची एकूण किंमत २९,५०० रुपये आहे. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माैदी शिवारात बुधवारी (दि. २) मध्यरात्री घडली असून, गुरुवारी (दि. ३) सकाळी उघडकीस आली.

माैदी (ता. रामटेक) शिवारात विटा इंडस्ट्रीयल नामक डाेलामाईट फॅक्टरी आहे. या फॅक्टरीच्या आवारात कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने आत प्रवेश केला. त्याने आवारातील स्टाेअर रूममध्ये ठेवलेले मशीनचे सुटे भाग चाेरून नेले. ही बाब गुरुवारी सकाळी उघड हाेताच फॅक्टरीचे व्यवस्थापक संताेष सेवकराम खराेले (३३, रा. माैदी) यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. चाेरीला गेलेल्या साहित्याची एकूण किमत २९ हजार ५०० रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड करीत आहेत.

Web Title: Dalamite factory premises