उपराजधानीला मिळणार ११५ एमएलडी वाढीव पाणी

By Admin | Updated: March 28, 2015 01:57 IST2015-03-28T01:57:55+5:302015-03-28T01:57:55+5:30

५०० शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार विचारात घेता केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय

Dairy gets 115 MLD of water | उपराजधानीला मिळणार ११५ एमएलडी वाढीव पाणी

उपराजधानीला मिळणार ११५ एमएलडी वाढीव पाणी

कोटींचा प्रकल्प : गडकरी, वेंकय्या नायडू यांच्या हस्ते आज लोकार्पण
नागपूर :
५०० शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार विचारात घेता केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरु त्थान अभियान(जेएनएनयुआरएम) योजनेंतर्गत महापालिकेच्या शहर वाढीव पाणीपुरवठा योजना पेंच टप्पा-४ चे काम पूर्ण झाले आहे. ६१० कोटीच्या या प्रकल्पाचे आज, शनिवारी लोकार्पण होत आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात ११५ एमएलडीने (द. ल. घ. मी.) वाढ होणार आहे.
केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्याहस्ते शनिवारी सकाळी ९.३० वाजता या योजनेचे लोकार्पण होत आहे.
अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Dairy gets 115 MLD of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.