डीएमईआरच्या दिरंगाईचा मेडिकलला फटका

By Admin | Updated: May 16, 2014 00:43 IST2014-05-16T00:43:58+5:302014-05-16T00:43:58+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) दिरंगाईचा फटका बसला आहे.

Daimai's medical treatment of DEMER | डीएमईआरच्या दिरंगाईचा मेडिकलला फटका

डीएमईआरच्या दिरंगाईचा मेडिकलला फटका

अर्धा उन्हाळा उलटूनही कूलरची प्रतीक्षा

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर) दिरंगाईचा फटका बसला आहे. मार्चमध्ये पाठविण्यात आलेल्या १00 कूलर्सच्या प्रस्तावाला डीएमईआरने आता मंजुरी दिली आहे. अर्धा उन्हाळा संपल्यावर पुढील आठवड्यात हे कूलर्स लागणार आहेत.

दरवर्षी उशिरा लागणारे कूलर्स आणि रुग्णांना होणारा त्रास पाहता मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांनी तप्त उन्हाळ्यात मेडिकलला कुलठेवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासूनच तयारी सुरू केली होती. विविध वॉर्ड आणि विभागांकडून कूलर्स संदर्भातील प्रस्ताव मागविण्यात आले होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, साधारण २00 वर कूलर्सची मागणी केली होती. त्याला निम्मे करून विविध आकाराच्या १00 कूलर्सचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्याकडे पाठविण्यात आला. परंतु याची किंमत तीन लाखांपर्यंत जात असल्याने, हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याकडे पाठविण्यात आला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावाला डीएमईआरने मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात मंजुरी दिली.

तब्बल दीड महिना रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांना उकाड्यात काढावा लागला. कूलर्सच्या पुरवठय़ाची जबाबदारी साई ऑटोमेशन या कंपनीला देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात सर्वच कूलर्स मेडिकलमध्ये लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून केलेल्या तयारीला डीएमईआरच्या दिरंगाईमुळे चांगलाच फटका बसला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Daimai's medical treatment of DEMER

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.