दररोज २०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST2021-04-30T04:11:09+5:302021-04-30T04:11:09+5:30

रेमडेसिविर वितरणाबाबत विभागीय आयुक्त समन्वय ठेवतील लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे वाढते प्रमाण ...

Daily supply of 200 metric tons of oxygen () | दररोज २०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा ()

दररोज २०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा ()

रेमडेसिविर वितरणाबाबत विभागीय आयुक्त समन्वय ठेवतील

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे वाढते प्रमाण दिलासादायक आहे. ऑक्सिजन व बेडच्या मागणीत कालपासून किंचित घट झाली असली तरी, कोरोनाचे सध्याचे संकट पाहता, जिल्ह्यात दररोज २०० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. या ऑक्सिजनचे योग्य वितरण करण्याचे आदेश केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत ऑनलाईन सहभागी झाले होते. दोन्ही मंत्रीमहोदयांच्या संयुक्त बैठकीत ऑक्सिजन पुरवठा, सिलिंडर खरेदी, ऑक्सिजन प्लॅन्ट पाईपलाईन, रेमडेसिविरच्या नियोजनाबाबत चर्चा झाली.

आ. आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन्‌ बी. यांच्यासह वाहतूकदार संघटनेचे प्यारेखान उपस्थित होते.

सध्या १४० मेट्रिक टन ऑक्सिजन भिलाईतून येत आहे. त्यामुळे १६० मेट्रिक टनाच्या जवळपास ऑक्सिजन रोज उपलब्ध होत आहे. जिल्ह्याची गरज १६० मेट्रिक टन असली तरी, २०० मेट्रिक टन इतक्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध असल्यास शासकीय व खासगी रुग्णालयांची गरज चांगल्या पध्दतीने भागवता येईल, अशी बैठकीत चर्चा झाली. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची तांत्रिक मदत करण्याबाबत गडकरी यांनी यावेळी आश्वस्त केले. ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याच्यादृष्ट्रीने सर्व नियोजन व जबाबदारी प्यारेखान यांना देण्यात आली आहे.

बॉक्स

प्रशासनाने ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करावे

गृह विलगीकरणातील रुग्णांवर ऑक्सिजन सिलिंडर लावून उपचार सुरू असल्याने सिलिंडरची मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात असलेले २० हजार सिलिंडरही अपुरे पडत आहेत. हे पाहता, महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सिलिंडर खरेदीची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने करावी. मेडिकल-मेयोमध्ये रुग्ण नातेवाईकांना बसण्याकरिता डोमची उभारणी तातडीने करावी, असे निर्देशही देण्यात आले.

बॉक्स

वर्धा येथून १० मेपासून मिळतील रेमडेसिविर

वर्धा येथील रेमडेसिविर उत्पादक कंपनीद्वारे निर्मित ३० हजार इंजेक्शन्सचा पहिला साठा १० मेपासून येईल. त्यामुळे रुग्णांना ते मुबलक व सहजरित्या उपलब्ध् करून देण्यासाठी नागपूर व अमरावती विभागनिहाय वितरण व समन्वयन संबंधित विभागीय आयुक्त करतील.

गुरुवारी चार्मोशी, एटापल्ली, सिरोंचा व अन्य तालुक्यातील शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर एवं व्हेंटिलेटर पाठविण्यात आले.

Web Title: Daily supply of 200 metric tons of oxygen ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.