मुलींना पळवून नेणारे दाेघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST2020-12-09T04:08:42+5:302020-12-09T04:08:42+5:30

सावनेर : अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या दाेघांना सावनेर पाेलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन अटक केली. त्या दाेघीही ...

Daghe arrested for kidnapping girls | मुलींना पळवून नेणारे दाेघे अटकेत

मुलींना पळवून नेणारे दाेघे अटकेत

सावनेर : अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या दाेघांना सावनेर पाेलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन अटक केली. त्या दाेघीही सख्ख्या बहिणी असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ही कारवाई मंगळवारी (दि. ८) करण्यात आली.

सागर राजेंद्र धुर्वे (२२) व आकाश सूरज सुनारिया (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. त्या दाेघांनी सद्भावना काॅलनी, पाटणसावंगी, ता. सावनेर येथे राहणाऱ्या दाेन सख्ख्या बहिणींशी ओळख केली आणि त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवून पळवून नेले. त्या दाेघीही अल्पवयीन असून, त्या अचानक बेपत्ता झाल्याने आईने ५ नाेव्हेंबर राेजी पाेलिसात तक्रार दाखल केली हाेती. त्या दाेघींना सागर व आकाश या दाेघांनी पळवून नेल्याची तसेच ते दाेघेही मध्य प्रदेशात गेल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्यांचा शाेध घेतला. ते इंदूर परिसरात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला असून, ही कारवाई उपविभागीय पाेलीस अधिकारी अशाेक सरंबळकर यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक विहान फुलेकर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

Web Title: Daghe arrested for kidnapping girls