चाेरीच्या प्रयत्नात असलेले दाेघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:18 IST2021-09-02T04:18:59+5:302021-09-02T04:18:59+5:30

सावनेर : पाेलिसांनी खापा मार्गावर केलेल्या कारवाईत स्वत:कडे धारदार शस्त्र बाळगून चाेरीच्या प्रयत्नात असलेल्या दाेघांना ताब्यात घेत अटक केली. ...

Daghe arrested for attempted theft | चाेरीच्या प्रयत्नात असलेले दाेघे अटकेत

चाेरीच्या प्रयत्नात असलेले दाेघे अटकेत

सावनेर : पाेलिसांनी खापा मार्गावर केलेल्या कारवाईत स्वत:कडे धारदार शस्त्र बाळगून चाेरीच्या प्रयत्नात असलेल्या दाेघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून धारदार सत्तूर व दुचाकी असा एकूण ३० हजार ५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.३१) मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.

अभिषेक हेमराज धुर्वे (२०, रा. गुमगाव माईन) व नितीन अशाेक हेडाऊ (२६, रा. किल्लापुरा, खापा, ता. सावनेर), अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. सावनेर ठाण्याचे पाेलीस पथक गस्तीवर असताना, खापा मार्गावरील प्रवासी निवाऱ्याजवळ दाेन्ही आराेपी आढळून आले. त्यांच्या हालचालीवरून पाेलिसांना संशय आल्याने त्यांनी आराेपींची चाैकशी सुरू केली. आराेपीच्या कंबरेला १५ इंच धारदार सत्तूर आढळून आला. शिवाय आराेपींनी अंधारात एमएच-४०/बीबी-६०६६ क्रमांकाची ॲक्टिव्हा दुचाकी उभी केली हाेती. आराेपींचा चाेरीचा बेत असल्याचे स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून धारदार सत्तूर व दुचाकी असा ३० हजार ५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी आराेपींविरुद्ध शस्त्र कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा नाेंदवून दाेघांना अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक शिवाजी नागवे करीत आहेत.

Web Title: Daghe arrested for attempted theft