रामटेक तालुक्यात दाेघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:09 IST2021-03-31T04:09:10+5:302021-03-31T04:09:10+5:30
रामटेक : दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये दाेघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना रामटेक तालुक्यातील कांद्री माईन व मानापूर येथे ...

रामटेक तालुक्यात दाेघांची आत्महत्या
रामटेक : दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये दाेघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना रामटेक तालुक्यातील कांद्री माईन व मानापूर येथे साेमवारी (दि.२९) उघडकीस आल्या.
कांद्री माईन येथील मंगेश बारीकराव काेकाेडे (२४) यास दारूचे व्यसन हाेते. दाेन दिवसापासून ताे घरून निघून गेला हाेता. दरम्यान गावातील एका विहिरीत मंगेशचा मृतदेह आढळून आला. याबाबत नागरिकांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी गुलाब काेकाेडे यांच्या तक्रारीवरून रामटेक पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.
दुसरी घटना मानापूर येथे साेमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मंगेश आसाराम समरीत (२३, रा. मानापूर) असे मृताचे नाव आहे. मृत मंगेशने आपल्या वडिलांना ‘बाबा एवढी दारू प्यायला का लागले’ असे म्हटले. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्याच्या वडिलांनी ‘तू मला शिकवताे काय?’ असे म्हटले असता, रागाच्या भरात मंगेशने विहिरीत उडी घेतली. लगेच त्याला विहिरीबाहेर काढून शासकीय दवाखान्यात नेले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी विष्णू गाेपाला समरीत (६३, रा. मानापूर) यांच्या तक्रारीवरून रामटेक पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार राऊत करीत आहेत.