दाेघांनी केली महिलेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:08 IST2021-03-22T04:08:23+5:302021-03-22T04:08:23+5:30

माैदा : महिलेच्या मुलाने दारू पिण्यास पैसे दिले नाही, या कारणावरून दाेघांनी महिलेस मारहाण करीत जखमी केले. ही घटना ...

Dagha beat up a woman | दाेघांनी केली महिलेस मारहाण

दाेघांनी केली महिलेस मारहाण

माैदा : महिलेच्या मुलाने दारू पिण्यास पैसे दिले नाही, या कारणावरून दाेघांनी महिलेस मारहाण करीत जखमी केले. ही घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेटमुंढरी येथे शुक्रवारी (दि.१९) दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

अनिल गुलाब देवतारे व सुनील गुलाब देवतारे दाेन्ही रा. घाेटमुंढरी, ता. माैदा अशी आराेपींची नावे असून, मायाबाई धनराज घरडे (४५, रा. घाेटमुंढरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. मायाबाई घरडे यांच्या मुलाने दारू पिण्याकरिता पैसे दिले नाहीत म्हणून आराेपींनी तिला शिवीगाळ केली व हाताबुक्क्यांनी व विटेने डाेक्यावर मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस अंमलदार पुडके करीत आहेत.

Web Title: Dagha beat up a woman