डागा, मेयोचा कायापालट होणार

By Admin | Updated: October 2, 2014 01:07 IST2014-10-02T01:07:19+5:302014-10-02T01:07:19+5:30

मध्य नागपूर विधानसभा मतदार संघात मेयो आणि डागा हे दोन शासकीय रुग्णालय आहेत. परिसरातील गरीब आणि सर्वसामान्य लोक येथे उपचार घेतात. मात्र दोन्ही रुग्णालयाची अवस्था अतिशय बिकट आहे.

Daga, Mayo will be transformed | डागा, मेयोचा कायापालट होणार

डागा, मेयोचा कायापालट होणार

मध्य नागपुरात काँग्रेसची प्रचार रॅली
नागपूर : मध्य नागपूर विधानसभा मतदार संघात मेयो आणि डागा हे दोन शासकीय रुग्णालय आहेत. परिसरातील गरीब आणि सर्वसामान्य लोक येथे उपचार घेतात. मात्र दोन्ही रुग्णालयाची अवस्था अतिशय बिकट आहे. या रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलविण्याचा संकल्प अनिस अहमद यांनी प्रचार रॅलीत केला.
बुधवारी सकाळी धान्य बाजार येथून त्यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रा जुनी मंगळवारी, आदमशाह चौक, निकालस मंदिर, चिंतेश्वर परिसरात फिरली. पदयात्रेदरम्यान त्यांनी परिसरातील महिला संघटनांशी बातचित केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पदयात्रेनंतर अनिस अहमद यांनी मतदार संघातील काही भागात नुक्कड सभा घेतल्या. तेलीपुरा, मस्कासाथ, पाचपावली येथे झालेल्या नुक्कड सभेत परिसरातील लोकांनी आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्याची गरज व्यक्त केली. याप्रसंगी अनिस अहमद म्हणाले की, मेयो रुग्णालय परिसरात नवीन इमारत, उपकरणे व विभागांना सुसज्ज करण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसेच डागा रुग्णालयात ५०० बेडची आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना याचा लाभ होणार आहे. जुनी मंगळवारी, टेलिफोन एक्सचेंज चौक व महालातील किल्ला परिसरातही त्यांची नुक्कड सभा पार पडली. त्यांच्या पदयात्रेला कृष्णा गोटाफोडे, राजेंद्र नंदनकर, कांता पराते, विठ्ठलराव कोंबाडे, ओमप्रकाश शाहीर, विजया ताजने, दिलीप ताजने, आनंद गवठे, विश्वनाथ पराते, राजू ताबूतवाले, नारायण पौनीकर, शेखर पौनीकर, रोशनी निखारे, नरेंद्र पराते, राजेंद्र कुंभारे, गोविंद डायरे, राजू तांबेकर, कृष्णराज कुंभारे, सुकेश निमजे, मुकेश पाठराबे, संदीप कुंभारे, रमेश मौंदेकर, प्रभाकर खाकरे, अरविंद चांडक, सुहास अवचट, रेखा बुरडकर, रागिनी कुंभारे, कमलताई वांदे, राजन कुंभारे, राजू महाजन, शैलेश घाटे, समीर कुकडे, महेश श्रीवास, मुन्ना दीक्षित, अशोक निखाडे, दिनेश बानाबाकोडे, रामदास कराडे, आनंदराव गायधने, विजय गायधने, विजय बाभरे, रितेश सोनी, श्रीकांत ढोलके, हिरामण मौंदेकर, जयमाला बारापात्रे, नागेश्वर पराते, मनोहर महुरखाये, बाबा रंभाड, पुष्पा निमजे, मनोहरभाई, अनिल सुने, ताराचंद बारापात्रे, राजन कुंभारे, पांडुरंग टाकळीकर, रवींद्र पराते, मनोहर विसपुते, भास्कर कोहाड, गणेश डोरले, रमेश निमजे, नारायण पराते, बाबा दारवेकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Daga, Mayo will be transformed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.