राेख रकमेसह दाेन गॅस सिलिंडर पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:59+5:302021-06-27T04:06:59+5:30
कन्हान : चाेरट्याने घरफाेडी करीत राेख २० हजार रुपये आणि दाेन गॅस सिलिंडर असा २५ हजार रुपयाचा मुद्देमाल चाेरून ...

राेख रकमेसह दाेन गॅस सिलिंडर पळविले
कन्हान : चाेरट्याने घरफाेडी करीत राेख २० हजार रुपये आणि दाेन गॅस सिलिंडर असा २५ हजार रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खाेपडी येथे शुक्रवारी (दि.२५) सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
चंद्रकला रघुनाथ वराडे (४०, रा. खाेपडी, ता. माैदा) यांच्या घरी कुणीच नसल्याची संधी साधत चाेरट्याने घराच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील लाेखंडी आलमारीमधील लाॅकर ताेडून तेथे पासबुकमध्ये ठेवलेले २० हजार रुपये तसेच घरातील गॅसला लावलेले सिलिंडर व तेथेच ठेवलेले एक भरलेले गॅस सिलिंडर दाेन्ही किंमत ५,००० रुपये असा एकूण २५ हजार रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब वराडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक फाैजदार येशू जाेसेफ करीत आहेत.