दाेन चाेरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:11 IST2021-08-23T04:11:31+5:302021-08-23T04:11:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : चाेरट्यांनी वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील राजाेली (पुनर्वसन) येथील किराणा दुकानात शनिवारी (दि. ...

Daen four arrested | दाेन चाेरट्यांना अटक

दाेन चाेरट्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : चाेरट्यांनी वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील राजाेली (पुनर्वसन) येथील किराणा दुकानात शनिवारी (दि. २१) मध्यरात्री चाेरी १२ हजार रुपये राेख चाेरून नेले. या प्रकरणात पाेलिसांनी दाेघांना रविवारी (दि. २२) दुपारी अटक केली.

लोकेश पुरुषोत्तम काकडे (३२) व जितेंद्र गोपाळ ठाकरे (२३) दाेघेही रा. कऱ्हांडला, ता. उमरेड अशी अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांची नावे आहेत. प्रदीप देव्हारे, रा. राजाेली (पुनर्वसन), ता. कुही यांचे गावात किराणा दुकान आहे. त्यांनी रविवारी सकाळी दुकान उघडले असता, दुकानात चाेरी झाल्याचे व ड्रावरमधील १२ हजार रुपये चाेरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लगेच पाेलिसांना सूचना देत तक्रार नाेंदविली.

ही चाेरी लाेकेशने केल्याची माहिती पाेलिसांना मिळताच त्यांनी कऱ्हांडला गाठून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदाराचे नाव सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी जितेंद्रला ताब्यात घेत दाेघांना अटक केली, अशी माहिती आनंद कविराज यांनी दिली. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी भादंवि ४६१, ३८० अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर, हवालदार संजय पायक, गणेश बाडबुजे, पंकज सावरे, प्रदीप खिल्लारे, पंकज चिवणे यांच्या पथकाने केली.

Web Title: Daen four arrested