प्राणघातक हल्ल्यात दाेघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:10 IST2021-04-23T04:10:00+5:302021-04-23T04:10:00+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : चाैघांनी घरी असलेल्या भावांना आवाज देऊन बाहेर बाेलावले आणि शिवीगाळ करीत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला ...

Daeghe was injured in the attack | प्राणघातक हल्ल्यात दाेघे जखमी

प्राणघातक हल्ल्यात दाेघे जखमी

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : चाैघांनी घरी असलेल्या भावांना आवाज देऊन बाहेर बाेलावले आणि शिवीगाळ करीत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. यातील एका भावाच्या पाेटावर चाकूने वार तर दुसऱ्याच्या डाेक्यावर काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्लेवाडा येथे बुधवारी (दि. २१) दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास घडली.

राेहित कन्हय्यालाल यादव व अमित कन्हय्यालाल यादव (२६) दाेघेही रा. लाल चाैक, सिल्लेवाडा, ता. सावनेर अशी जखमी भावांची नावे असून, आराेपींमध्ये प्रतीक चाैरे व अन्य तिघांचा समावेश आहे. प्रतीकचे राेहितसाेबत काही दिवसापूर्वी भांडण झाले हाेते. राेहित व अमित घरी झाेपले असताना प्रतीक अन्य तिघांना घेऊन त्याच्या घराजवळ आला आणि त्याने राेहितला आवाज दिला. अमित घराबाहेर येताच प्रतीकने त्याला तेरा भाई राेहित कहां है, अशी विचारणा केली आणि अन्य दाेघांनी त्याच्या डाेक्यावर काठीने मारहाण केली.

त्याचवेळी राेहित घराबाहेर येताच आराेपींनी त्याच्या पाेटावर चाकूने वार केले. ताे जखमी हाेताच आराेपींनी घटनास्थळाहून पळ काढला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. दाेन्ही जखमींना चिचाेली (खापरखेडा), ता. सावनेर प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अमित यादव याच्या तक्रारीवरून चारही आराेपींविरुद्ध ३२६, ३२४, २९४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक निमगडे करीत आहेत. वृत्त लिहिस्ताे आराेपींना अटक करण्यात आली नव्हती.

Web Title: Daeghe was injured in the attack