प्राणघातक हल्ल्यात दाेघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:52+5:302021-03-04T04:11:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : चाैघांपैकी एकाने दारूची बाटली पुलावरून खाली फेकली. त्यामुळे जखमी झालेल्या तरुणाने याबाबत विचारणा केली. ...

प्राणघातक हल्ल्यात दाेघे जखमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : चाैघांपैकी एकाने दारूची बाटली पुलावरून खाली फेकली. त्यामुळे जखमी झालेल्या तरुणाने याबाबत विचारणा केली. त्यामुळे चिडलेल्या चाैघांनी चाकूने वार करून एकास व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुसऱ्यास गंभीर जखमी केले. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गहुहिवरा शिवारात रविववारी (दि. २८) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात चाैघांना अटक करण्यात आली असून, त्यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे, अशी माहिती ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी दिली.
पुंडरेश उर्फ अंकित पंडेश्वरी सिंग (४०) व संकेत प्रेमशंकर तिवारी (३१, दाेघेही रा. कांद्री (कन्हान), ता. पारशिवनी) अशी जखमींची नावे असून अटकेतील आराेपींमध्ये विधीत उर्फ माैसी पंजाब काेमटे (२३), सुवंश कुनदीपसिंग खंडुजे (१८, दाेघेही रा. शिवनगर, कन्हान, ता. पारशिवनी), लक्की अरविंद नाईक (२०, रा. अशोकनगर, कन्हान) या तिघांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
अंकित व संकेत घरी परत जात असताना चाैघांपैकी एकाने गहुहिवरा शिवारातील पुलावरून त्यांच्या दिशेने दारूची बाटली फेकली. बाटली का फेकली अशी विचारणा करताच चाैघांनी अश्लील शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यातच विधीतने अंकितच्या पाेटावर चाकूने वार केले. संकेत त्याला वाचविण्यासाठी पुढे सरसावला असता अन्य तिघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी तसेच दगडांनी बेदम मारहाण केली. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कन्हान शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कन्हान पाेलिसांनी संकेत तिवारी याच्या तक्रारीवरून भादंवि ३०७, २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक सतीश मेश्राम करीत आहेत.