दुचाकी अपघातात दाेघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:55+5:302021-04-13T04:08:55+5:30

काेंढाळी : भरधाव दुचाकीस्वाराने ॲक्टिव्हाला मागून धडक दिली. त्यात दाेन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या ...

Daeghe seriously injured in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात दाेघे गंभीर जखमी

दुचाकी अपघातात दाेघे गंभीर जखमी

काेंढाळी : भरधाव दुचाकीस्वाराने ॲक्टिव्हाला मागून धडक दिली. त्यात दाेन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चमेली शिवारात साेमवारी (दि.१२) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

विजय उके (६०, रा. चमेली, ता. काटाेल) व अनिकेत हितेंद्र पाटील (३१, रा. बिच्छू टेकडी, अमरावती) अशी जखमींची नावे आहेत. विजय उके हे काेंढाळी येथे दवाखान्यात उपचार केल्यानंतर आपल्या एमएच-४०/सीई-१७८६ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीने चमेली गावी जात हाेते. दरम्यान, गावासमाेरील वळणावर अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वार अनिकेत पाटील याने उके यांच्या ॲक्टिव्हाला मागून जाेरात धडक दिली. त्यात दाेन्ही दुचाकीस्वार राेडवर पडून गंभीररीत्या जखमी झाले. नागरिकांनी जखमींची मदत करून घटनेची माहिती काेंढाळी पाेलिसांना दिली. ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी घटनास्थळ गाठून जखमींना काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे प्राथमिक उपचारानंतर दाेन्ही जखमींना नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास ठाणेदार विश्वास फुल्लरवार करीत आहेत.

Web Title: Daeghe seriously injured in a two-wheeler accident