सिद्धेश्वर मंगल कार्यालयात सिलिंडरचा स्फोट

By Admin | Updated: December 4, 2014 00:41 IST2014-12-04T00:41:00+5:302014-12-04T00:41:00+5:30

एका लग्न सोहळ्यादरम्यान एलपीजी सिलिंडर लिकेज असल्याने स्फोट घडला. ही घटना बुधवारी दुपारी अजनी पोलीस हद्दीतील मानेवाडा रोडवरील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात घडली. अग्निशमन दलाचे जवान

Cylinder blast in Siddheshwar Mangal office | सिद्धेश्वर मंगल कार्यालयात सिलिंडरचा स्फोट

सिद्धेश्वर मंगल कार्यालयात सिलिंडरचा स्फोट

मोठा अनर्थ टळला : स्वयंपाक खोलीत होते आठ सिलिंडर
नागपूर : एका लग्न सोहळ्यादरम्यान एलपीजी सिलिंडर लिकेज असल्याने स्फोट घडला. ही घटना बुधवारी दुपारी अजनी पोलीस हद्दीतील मानेवाडा रोडवरील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात घडली. अग्निशमन दलाचे जवान अगदी वेळेवर घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.
सिद्धेश्वर मंगल कार्यालयात बुधवारी करडे आणि चांदेकर कुटुंबीयांचा लग्नसोहळा होता. या समारंभाला एक हजारापेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. सभागृहाच्या स्वयंपाकगृहात भोजन तयार होत होते. तेव्हाच अचानक सिलिंडरमध्ये लीकेज असल्याने स्फोट झाला. सभागृहात उपस्थित लोक आपला जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. सर्वत्र धावपळ उडाली. आमंत्रित पाहुण्यांपैकीच कुणीतरी अग्निशमन विभागाला फोनवर कळविले. माहिती मिळताच तीन गाड्या घटनास्थळी लगेच दाखल झाल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. स्वयंपाक खोलीत आठ सिलिंडर होते. आग अधिक वेळ राहिली असती तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मंगल कार्यालयामधील स्वयंपाकघरात आग विझविण्यासाठी कुठलीच सोय नव्हती. अग्निशमन दलाने मदतीचा हात दिल्याने अनर्थ टळला.(प्रतिनिधी)

Web Title: Cylinder blast in Siddheshwar Mangal office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.