दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:09 IST2021-03-19T04:09:12+5:302021-03-19T04:09:12+5:30

देवलापार : भरधाव माेटरसायकलने सायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना देवलापार ...

Cyclist killed in two-wheeler collision | दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार ठार

दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार ठार

देवलापार : भरधाव माेटरसायकलने सायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या सायकलस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खरपडा (ता. रामटेक) शिवारात नुकतीच घडली.

चरणदास नामदेव पाटील (५५, रा. सावंगी, ता.रामटेक) असे मृताचे नाव आहे. चरणदास सायकलने हिवराबाजारकडून पवनीकडे येत हाेता तर, रमेश ऊर्फ साेनू गजानन बुरले (२५, रा. चाेरबाहुली, ता. रामटेक) हा एमएच-४०/बीझेड-६५२४ क्रमांकाच्या माेटरसायकलने पवनीहून हिवराबाजारकडे वेगात जात हाेता. दरम्यान, खरपडा शिवारात त्याच्या माेटरसायकलची चरणदासच्या सायकलला जाेरात धडक लागली. त्यात चरणदास गंभीर जखमी झाल्याने त्याला लगेच नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी दुचाकीचालक रमेशविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास परीविक्षाधीन पाेलीस उपनिरीक्षक घाेडके करीत आहेत.

Web Title: Cyclist killed in two-wheeler collision