सायबरटेकच्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त कर निर्धारकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 14:00 IST2017-10-31T13:59:05+5:302017-10-31T14:00:58+5:30
नागपूर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने नियुक्त के लेल्या मे. सायबरटेक सिस्टम्स अॅन्ड सॉफ्टेअर लिमिटेड कं पनीचे कर्मचारी मालमत्ताधारकांकडून अवैध वसुली करीत आहेत.

सायबरटेकच्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त कर निर्धारकावर हल्ला
आॅनलाईन लोकमत
नागपूर:
नागपूर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने नियुक्त के लेल्या मे. सायबरटेक सिस्टम्स अॅन्ड सॉफ्टेअर लिमिटेड कं पनीचे कर्मचारी मालमत्ताधारकांकडून अवैध वसुली करीत आहेत. या गैरप्रकाराला विरोध दर्शविणाऱ्या नागरिकांना धमक्या देऊन मारहाण करण्याचे प्रकार सुरू केले आहेत. सोमवारी पांडे ले-आऊ ट येथील रहिवासी व महापालिकेतील सेवा निवृत्त सहायक कर निरीक्षण विजय राजाराम रेवतकर यांच्यावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणादरम्यान हल्ला केला. या संदर्भात रेवतकर यांनी महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच प्रतापनगर पोलीस स्टेनशमध्येही तक्रार नोंदविली आहे. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
या कंपनीकडून एकाच घराचे अनेक युनिट दर्शविण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे दोन ते अडीच कोटींचा महापालिकेला फटका बसणार आहे. युनिटच्या गोंधळामुळे मालमत्ता विभागाकडे नोंद असलेल्या मालमत्ता व देयकांची संख्या यात मोठी तफावत निर्माण होणार आहे. यातून कर वसुली करताना अडचणी निर्माण होणार असल्याने मालमत्ता विभागापुढे नवा पेच निर्माण झाला आहे. विरोधीपक्षाच्या नगरसेवक व नेत्यांनी यासंदर्भात संताप व्यक्त करून सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्याचा तसेच आंदोलनाचा इशारा दिला आहे.