५० लाख रुपये हडपण्याचा कट
By Admin | Updated: June 26, 2015 02:44 IST2015-06-26T02:44:58+5:302015-06-26T02:44:58+5:30
बनावट कागदपत्र आणि भलत्याच व्यक्तीला उभे करून चंद्रपूरच्या एका व्यक्तीला ५० लाखांचा गंडा घालण्याचा कट दोघांनी रचला.

५० लाख रुपये हडपण्याचा कट
एक लाख हडपले : बनावट कागदपत्रे, जमीनमालकही बनावट
ंनागपूर : बनावट कागदपत्र आणि भलत्याच व्यक्तीला उभे करून चंद्रपूरच्या एका व्यक्तीला ५० लाखांचा गंडा घालण्याचा कट दोघांनी रचला. वेळीच ही बनवाबनवी उघड झाल्यामुळे संबंधित व्यक्तीची ४९ लाख रुपये बचावले. ५० लाख रुपये हडपण्याचा कट रचून एक लाख रुपयांचा अॅडव्हान्स घेणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव संजय रमेश शर्मा असे आहे. तो आणि त्याचा एक साथीदार पाचपावलीतील कमाल चौकाजवळ राहतात.
भद्रावती(जि.चंद्रपूर)जवळच्या चिचोर्डी येथील देवराव भदुजी बदकी(वय ५९)यांचा सोनेगाव परिसरात जय बद्रीनाथ गृह निर्माण सहकारी संस्थेत(मौजा भामटी)एक भूखंड आहे. आरोपी शर्माने बनावट कागदपत्रे तयार करून तो भूखंड संदीप गौरीशंकर दिवेकर यांना ५० लाखात विकण्याचा सौदा केला. बदकी यांच्या नावाने भलताच एक इसम उभा केला. त्यानंतर शर्मा आणि त्याच्या साथीदाराने दिवेकर यांच्याकडून १० डिसेंबर २०१४ ला एक लाख रुपये अॅडव्हान्स घेतले.
दरम्यान, बदकी यांच्या लक्षात हा गैरप्रकार आल्यामुळे त्यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी शर्मा आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. ही बनवाबनवी लवकर उजेडात आल्यामुळे दिवेकर यांचे ४९ लाख रुपये वाचले. (प्रतिनिधी)
नोकरीच्या नावाखाली फसवणूक
नागपूर : लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणींची फसवणूक केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या. सीताबर्डी आणि प्रतापनगरातील या घटना आहेत.
सीताबर्डीतील तरुणीला दिल्लीतील ठगाने १०,५४० रुपयांचा गंडा घातला. विजेंद्र जोशी असे त्याचे नाव असून तो ३३२, विनोदनगर, दिल्ली येथे राहतो. आॅनलाईन जॉब सर्चिंग करणाऱ्या करिश्मा संजय गंगवानी (वय २३, रा. भगवाघर लेआऊट, धरमपेठ) हिला जोशीने रॅनबॅक्सी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. मुलाखत आणि इतर खर्चासाठी त्याने करिश्माला २३ जूनला १०, ५४० रुपये जमा करण्यास सांगितले. त्याने सांगितल्यानुसार करिश्माने पंजाब नॅशनल बँकेच्या खाते क्र ४८३८०००१०००५३१६५ मध्ये रक्कम जमा केली. मात्र, आरोपीकडून नंतर कोणतेही मुलाखतपत्र अथवा ई-मेल आला नाही. फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी विजेंद्र जोशीविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)