सेवेबाबत ग्राहकांनी दक्ष असावे
By Admin | Updated: January 23, 2015 02:49 IST2015-01-23T02:49:55+5:302015-01-23T02:49:55+5:30
कंपन्यांकडून मिळणाऱ्या आवश्यक सेवेसंदर्भात ग्राहकांनी दक्ष असावे, असे आवाहन टेलिकॉम रेग्युलेटरी अॅॅथॉरिटी आॅफ इंडियाचे (ट्राय) कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र ....

सेवेबाबत ग्राहकांनी दक्ष असावे
नागपूर : कंपन्यांकडून मिळणाऱ्या आवश्यक सेवेसंदर्भात ग्राहकांनी दक्ष असावे, असे आवाहन टेलिकॉम रेग्युलेटरी अॅॅथॉरिटी आॅफ इंडियाचे (ट्राय) कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र क्षेत्राचे सल्लागार प्रमुख डॉ. सिबीचेन के. मॅथ्यू यांनी येथे केले.
ट्रायच्या बेंगळुरू कार्यालयातर्फे अधिकारांची माहिती नागरिकांना देण्यासाठी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात गुरुवारी ग्राहक जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. मॅथ्यू यांनी क्षेत्रीय कार्यालयाची भूमिका, कार्यपद्धती तसेच दूरध्वनी ग्राहक संरक्षणासंदर्भात आतापर्यंत घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली. दूरध्वनीसंबंधित मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी, अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन, मूल्यधारित सेवा, तक्रार नोंद कार्यपद्धती, टेरिफ आदींबद्दल ट्रायच्या नियमांवर प्रकाश टाकण्यात आला.
टेरिफ प्लॅन सहा महिने बंधनकारक
दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपनांना आपला टेरिफ प्लॅन दोन प्रसिद्ध वर्तमानपत्रात छापून आणणे बंधनकारक आहे. यातील एक वर्तमानपत्र इंग्रजी आणि क्षेत्रीय भाषेचा असावा. एखादा नवीन टेरिफ प्लॅन कमीत कमी सहा महिने पुरविणे बंधनकारक आहे. फोन सेवेचा वापर न करणाऱ्या ग्राहकांची सेवा बंद करण्याबाबत काही नियम जाहीर केले आहेत. त्यामध्ये प्रीपेड सेवेत ९० दिवसांपेक्षा कमी दिवस सेवेचा वापर नसल्यास कंपनी सेवा बंद करू शकत नाही. ग्राहकाच्या फोन खात्याात कमीत कमी २० किंवा त्यातून अधिक जमा असल्यास ही सेवा बंद करता येणार नाही.
मोबाईल डिस्कनेक्ट झाल्यावर पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी १५ दिवसांचा अधिक कालावधी देण्यात यावा. दूरध्वनी सेवेप्रमाणेच केबल टीव्ही नेटवर्कच्या डिजिटलायझेशन संदर्भात माहिती देण्यात आली. केबल आॅपरेटर्सकडे सेवेसंदर्भात तक्रार निवारण व्यवस्था असणे बंधनकारक आहे.
यावेळी कन्झ्युमर्स हॅण्डबुकचे उपस्थितांना वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात बेंगळुरू क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी के. मुरलीधर, अधिकारी, संस्थांचे कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील सदस्य, स्वयंसेवा संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)