चिटणीस पार्कवर करंट

By Admin | Updated: July 5, 2016 02:40 IST2016-07-05T02:40:07+5:302016-07-05T02:40:07+5:30

चिटणीस पार्कमध्ये क्रिकेट खेळताना मैदानातील पोलचा करंट लागल्यामुळे एका बालकाचा करुण अंत झाला. कोतवाली

Current at the Chitnis Park | चिटणीस पार्कवर करंट

चिटणीस पार्कवर करंट

नागपूर : चिटणीस पार्कमध्ये क्रिकेट खेळताना मैदानातील पोलचा करंट लागल्यामुळे एका बालकाचा करुण अंत झाला. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
मोहम्मद अनिस मोहम्मद युनूस शेख (वय १२) हा रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास चिटणीस पार्कमध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. मैदानातील पोलला त्याचा हात लागताच अनिसला जोरदार करंट लागला. ते पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. गोळा झालेल्या लोकांनी अनिसला मेयोत नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना कळताच अनिस राहत असलेल्या भालदारपुऱ्यात तीव्र शोककळा पसरली. अनिसचे वडील युनूस यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. चिटणीस पार्कवर दररोज मुले क्रिकेट व इतर खेळ खेळतात. पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे मैदानातील लोखंडी पोलला करंट आहे की नाही याची खबरदारी चिटणीस पार्कच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने घेतली नाही. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. (प्रतिनिधी)

Web Title: Current at the Chitnis Park