शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

नागपुरात कर्फ्यू संपला, वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 19:31 IST

महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दोन दिवस शहरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले. लॉकडाऊनची लिटमस टेस्ट म्हणून जनता कर्फ्यूचा प्रयोग प्रशासनाने केला आणि तो यशस्वीही ठरला. पण सोमवारी जैसे थे अशीच स्थिती शहरात दिसून आली. पुन्हा बाजारपेठा गजबजल्या, रस्त्यावरची वर्दळ वाढली.

ठळक मुद्देनागपूरकरांनो संयम ठेवा : बाजारपेठा फुलल्या, रस्तेही गजबजले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दोन दिवस शहरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले. लॉकडाऊनची लिटमस टेस्ट म्हणून जनता कर्फ्यूचा प्रयोग प्रशासनाने केला आणि तो यशस्वीही ठरला. पण सोमवारी जैसे थे अशीच स्थिती शहरात दिसून आली. पुन्हा बाजारपेठा गजबजल्या, रस्त्यावरची वर्दळ वाढली, सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी लोक पोहचले. भाजीचे बाजार पुन्हा सजले. लोक मोठ्या संख्येने घरातून निघाले. त्यामुळे शनिवार, रविवारी शहरात दिसून आलेला जनता कर्फ्यूचा असर सोमवारी उतरला होता.मेडिकल चौक

लोकमतमध्ये रविवारच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या मेडिकल चौकातील छायाचित्राने जनता कर्फ्यू किती यशस्वी ठरला याची प्रचिती करून दिली. पण सोमवारी या छायाचित्राच्या अगदी विपरीत परिस्थिती मेडिकल चौकात दिसून आली. चौकाच्या सभोवतालची दुकाने सुरू झाली. फुटपाथवरही दुकाने लागली. लोकांची खरेदी सुरू झाली. वाहनांची वर्दळ सभोवताली दिसून आली. दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास हे चित्र होते.सीताबर्डी मेन रोड
सीताबर्डीच्या मेन रोडवर ऑड-इव्हन फॉर्म्युल्यानुसार दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सोमवारी पण या फॉर्म्युल्यानुसार दुकाने सुरू झाली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका भागातील दुकाने पूर्ण सुरू होती. दुकानात ग्राहकांची गर्दी नसली तरी, मेन रोडवर लोकांची वर्दळ होती. घराबाहेर पडलेल्या लोकांची गर्दी लक्षात घेता, सीताबर्डी मार्केटमध्ये दुपारी गर्दी नसली तरी, दुपारी ४ नंतर नक्कीच गर्दी होईल.सरकारी कार्यालयात वर्दळ कायमसरकारी कार्यालयांना शनिवार आणि रविवार सुटी असल्यामुळे त्यातच जनता कर्फ्यू असल्याने दोन दिवस पुरता शुकशुकाट होता. सोमवारी मात्र कार्यालये सुरू झाल्यापासून कार्यालयातील कर्मचाऱ्यांबरोबर कामासाठी येणाऱ्यालोकांची गर्दी दिसून आली. सरकारी कार्यालय परिसरातील वाहनतळावरील वाहनांची संख्या लक्षात घेता, लोकांच्या गर्दीचा अंदाज बांधता येऊ शकत होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारTrafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर