पुस्तकांच्या काळ्याबाजारावर अंकुश

By Admin | Updated: June 8, 2015 02:43 IST2015-06-08T02:43:48+5:302015-06-08T02:43:48+5:30

सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा काळाबाजार होत असल्याने, विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नव्हती.

Curbing black bars on books | पुस्तकांच्या काळ्याबाजारावर अंकुश

पुस्तकांच्या काळ्याबाजारावर अंकुश

मंगेश व्यवहारे  नागपूर
सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा काळाबाजार होत असल्याने, विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नव्हती. यंदा पहिल्यांदाच सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकावर लोगो लावण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व शिक्षा अभियानाची पुस्तके विकता येणार नाही. सर्व शिक्षा अभियानाची १०० टक्के पुस्तके आठवठाभरात पोहचणार आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी पुस्तके मिळतील.
ंपुस्तकांचा होणाऱ्या काळ्याबाजारामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नसल्याची ओरड होत होती. यंदा मात्र पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तकाच्या निर्मितीचे नियोजन केले असून, सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांवर अभियानाचा लोगो लावण्यात आला आहे. पुस्तकावर किंमतसुद्धा छापलेली नाही. त्यामुळे या पुस्तकांची विक्री करता येणार नाही. परिणामी त्याचा काळाबाजार होणार नाही, असा पाठ्यपुस्तक मंडळाचा दावा आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क पाठ्यपुस्तकाचा पुरवठा करण्यात येतो. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीपासून वितरणापर्यंतची जबाबदारी बालभारतीची असते. यावर्षी पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याकडून आॅनलाईन पाठ्यपुस्तकाची मागणी मागविण्यात आली. मागणीनुसारच पुस्तके छापण्यात आली. ज्या शाळा सर्व शिक्षा अभियानात येत नाही, अशा शाळांसाठी स्वतंत्र पुस्तके छापण्यात आली. त्यावर पुस्तकाचे विक्रीमूल्य नमूद केले आहे. पाठ्यपुस्तक मंडळाने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, त्यादृष्टीने सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांच्या निर्मितीचे काम झाले आहे. पुरवठ्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. २६ जूनला शाळा सुरू होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या १५ दिवसांपूर्वीच नियोजित स्थळावर पुस्तके पोहचणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळतील, असा दावा बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी केला.
ंनागपूर विभागात ८६ टक्के पुस्तके पोहचली
सर्व शिक्षा अभियानांतर्गत नागपूर विभागातून ६६,२८,७२३ एवढ्या पुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे आली होती. अद्यापपर्यंत बालभारतीने ५७,२२,०५४ एवढ्या पुस्तकांचा पुरवठा केला आहे. यात नागपूर जिल्ह्याला ७८ टक्के, चंद्रपूर ९३, गोंदिया ७२, भंडारा ९५, वर्धा ९५, गडचिरोली ९४ टक्के पुस्तके पोहचली आहेत. प्रत्येक तालुक्याला पुस्तके पोहचली आहेत. आठवडाभरात १०० टक्के पुरवठ्याचे लक्ष्य पूर्ण करणार.
किशोर पाटणकर,
भांडार अधीक्षक, बालभारती, विभागीय कार्यालय

Web Title: Curbing black bars on books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.