शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांसाठी सांस्कृतिक पर्वणी : खासदार सांस्कृतिक महोत्सव ३० पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:45 IST

नागपूरकरांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला बहुप्रतीक्षित असा खासदार सांस्कृतिक महोत्सव ३० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, महानाट्य अन् बॅलेची मेजवानी असलेला हा महोत्सव नागपूरकरांसाठी एक सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.

ठळक मुद्देअभिनेते अनिल कपूर, जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला बहुप्रतीक्षित असा खासदारसांस्कृतिक महोत्सव ३० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. संगीत, नृत्य, महानाट्य अन् बॅलेची मेजवानी असलेला हा महोत्सव नागपूरकरांसाठी एक सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित या महोत्सवाचे सायंकाळी ६ वाजता अभिनेते अनिल कपूर व जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते उद्घाटन होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकार होत आहे. यावेळी गडकरी यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार उपस्थित राहतील. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘यादों का चला कारवां’ हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. १८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल. विशेष म्हणजे मनोरंजनाचा खजिना असलेल्या या महोत्सवात नागपुरातील तब्बल ९०० कलावंतांना सामावून घेण्यात आले असल्याची माहिती महोत्सव समितीचे अध्यक्ष आ. अनिल सोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या टीम तयार करण्यात आल्या असून, कार्यक्रमस्थळी दररोज सकाळी १० वाजता नि:शुल्क पासेस वितरण केले जाईल. पत्रकार परिषदेला जयप्रकाश गुप्ता, मधुप पांडेय, राजेश बागडी, बाळ कुळकर्णी, हाजी अब्दुस कदीर, संदीप गवई, संजय गुळकरी, प्रमोद पेंडके उपस्थित होते.असा आहे महोत्सव

  • ३० नोव्हेंबर : उद्घाटन व ‘यादों का चला कारवां’गाण्यांचा कार्यक्रम.
  • १ डिसेंबर : गायक संगीतकार श्रीधर फडके यांचा ‘बाबुजींची गाणी’ कार्यक्रम.
  • २ डिसेंबर : ‘चला हवा येऊ द्या’ची टीम हसवून लोटपोट करणार.
  • ७ डिसेंबर : तथागत महानाट्य
  • ८ डिसेंबर : ‘राष्ट्रपुरुष अटल’ महानाट्य
  • ९ डिसेंबर : गायक व खा. मनोज तिवारी यांचा ‘उत्तर भारत की सुगंध’ सांगीतिक कार्यक्रम.
  • १० डिसेंबर : मनोज जोशी यांचे ‘चाणक्य’ नाटक.
  • ११ डिसेंबर : रामकृष्ण मठ प्रस्तुत ‘युगपुरुष विवेकानंद’ संगीतमय चरित्रपट.
  • १२ डिसेंबर : अभिनेते मोहन जोशी व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या ‘नटसम्राट’ नाटकाचा प्रयोग.
  • १४ डिसेंबर : राकेश चौरसिया यांचा फ्युजन व शिवमणी यांचे ड्रम वादन.
  • १५ डिसेंबर : ‘बॅले आॅन गंगा’ अनोखा कार्यक्रम.
  • १६ डिसेंबर : अभिनेत्री हेमा मालिनी यांची ‘दुर्गा’ नृत्यनाटिका.
  • १७ डिसेंबर : ‘शिर्डी के साईबाबा’ महानाट्य.
  • १८ डिसेंबर : ‘नाद अनाहद’ हा नादब्रह्मचा सृजनात्मक सांगीतिक आविष्कार.

नागपूरकराने संगीतबद्ध केले महोत्सवाचे ‘थीम साँग’महोत्सवासाठी विशेष ‘थीम सॉँग’ तयार करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांदोडकर याने ते गायले आहे. विशेष म्हणजे नागपूरकर संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांनी ते संगीतबद्ध केले आहे.

टॅग्स :Member of parliamentखासदारcultureसांस्कृतिक