शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

नागपूरच्या संत्रा मार्केटकडील हॉटेल्समध्ये अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:30 IST

उघड्यावर अन्न शिजवणे, काळवंडलेल्या टेबल-खुर्च्यावर ग्राहकांना खायला देणे, पिण्याचे रिकामे झालेले ग्लास न धुताच तसेच भरुन पुन्हा पाणी पुरविणे, असा किळसवाणा प्रकार संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये पाहावयास मिळाला. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देग्राहकांचे आरोग्य धोक्यात : उघड्यावर किचन, ग्लास न धुताच देतात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उघड्यावर अन्न शिजवणे, काळवंडलेल्या टेबल-खुर्च्यावर ग्राहकांना खायला देणे, पिण्याचे रिकामे झालेले ग्लास न धुताच तसेच भरुन पुन्हा पाणी पुरविणे, असा किळसवाणा प्रकार संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये पाहावयास मिळाला. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.संत्रा मार्केटकडील हॉटेल्समध्ये ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविण्यात येत असल्याची माहिती मिळताच ‘लोकमत’ने या भागातील हॉटेल्सची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव उजेडात आले. संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होताना दिसला. स्वच्छतेच्या दृष्टीने हॉटेल्समध्ये काहीच खबरदारी घेतल्या जात नसल्याची बाब दृष्टीस पडली.उघड्यावर किचनसंत्रा मार्केटकडील भागात असलेल्या बहुतांंश सर्वच हॉटेल्सचे किचन रस्त्याच्या कडेला आहेत. खाद्यपदार्थ तयार करताना रस्त्यावरील धूळ हवेद्वारे उडून जेवणात मिसळते. उघड्यावरच हॉटेल्समधील स्वयंपाकी मोठमोठ्या पातेल्यात बिर्याणी तयार करताना आढळले. अन्न पदार्थांमध्ये मिसळणाऱ्या धुळीच्या कणांमुळे ग्राहकांना विविध आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे..स्वयंपाकाची भांडीही घाणेरडीस्वयंपाक केल्यानंतर त्यातील अन्न संपेपर्यंत ते भांडे तसेच ठेवण्यात येते. पुन्हा स्वयंपाक करण्याच्या पूर्वी ते भांडे थातूरमातूर पद्धतीने धुण्यात येते. यामुळे बहुतांश हॉटेल्समधील भांडी घाणेरडी असल्याचे पाहणीत आढळून आले. याच घाणेरड्या भांड्यात अन्न शिजवून ते ग्राहकांना पुरविण्यात येते. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीच काळजी हॉटेल्समध्ये घेण्यात येत नसल्याची बाब निदर्शनास आली.कोंदट वातावरणात बसण्याची व्यवस्थाअतिशय अरुंद जागेत किचन, खाद्यपदार्थ ठेवण्याची आणि ग्राहकांच्या बैठकीची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे. यामुळे कोंदट वातावरणात बसून ग्राहकांना जेवण करावे लागते. दुसरा पर्याय म्हणजे ग्राहकांसाठी रस्त्याच्या कडेला टेबल खुर्च्या टाकून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात रस्त्यावरील धूळ सहज टेबलवर उडते. त्यामुळे आत बसल्यास घाणेरडे वातावरण आणि बाहेरही धुळीचे साम्राज्य अशी परिस्थिती पाहावयास मिळाली.ग्लास न धुताच देतात पाणीएका हॉटेलमध्ये काही काळ थांबल्यानंतर एक धक्कादायक प्रकार दिसला. हॉटेलमध्ये पिण्याचे पाणी पुरविणारा कामगार सात-आठ ग्लासचा ट्रे रिकामा झाल्यानंतर ट्रे घेऊनहॉटेलमधील बेसिनजवळ जात होता. तेथे ट्रे मधील ग्लास खाली काढून धुण्याऐवजी पुन्हा त्याच ग्लासमध्ये पाणी भरून हा कर्मचारी ग्राहकांना पाणी देताना दिसला. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची बाब उजेडात आली.काही पैशांसाठी आरोग्याशी तडजोडसंत्रा मार्केटकडील भागात ग्राहकांना कमी पैसे देऊन जेवण किंवा नाश्ता पुरविण्यात येतो. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील असंख्य प्रवासी या हॉटेल्समध्ये धाव घेतात. पैसे कमी लागत असले तरी आरोग्यासाठी या हॉटेल्समधील स्वच्छता धोकादायक आहे, या गंभीर बाबीकडे ग्राहक दुर्लक्ष करतात. यामुळे ग्राहकांना विविध आजार जडण्याची शक्यता निर्माण होते.घरगुती सिलिंडरचा वापररेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात स्वयंपाकासाठी घरगुती सिलिंडर वापरण्यात येत असल्याचे दिसून आले. व्यावसायिक वापरासाठी वेगळ्या सिलिंडरची नोंदणी करावी लागते. परंतु या नियमाकडे दुर्लक्ष करून बहुतांश हॉटेल्सचे संचालक घरगुती सिलिंडरच स्वयंपाकासाठी वापरताना दिसले. या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन नागरिकांना जाणवणारी सिलिंडर टंचाई दूर करण्याची गरज आहे. 

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर