शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

देशासमोरील आव्हाने पेलणे हेच व्हीजन : डॉ. सुधीर मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 22:06 IST

यापुढे भारताला २१ व्या शतकाचे आव्हान पेलण्यासाठी विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, शेतकरीकेंद्रित शेती, कौशल्य व संस्कारक्षमकेंद्रित युवक सक्षमीकरण, रिटेल बिझनेसकेंद्रित भारतीय अर्थव्यवस्था, मानवकेंद्रित सहयोगी समाज निर्मिती, हीच माझ्या पुढील आयुष्याची पंचसूत्री आहेत तसेच हेच माझे व्हीजन व मिशन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राचे संस्थापक संचालक डॉ.सुधीर मेश्राम यांनी केले.

ठळक मुद्दे‘ग्लोबल फ्युचरिस्टिक ट्रेंड्स इन लाईफ सायन्स’ या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यापुढे भारताला २१ व्या शतकाचे आव्हान पेलण्यासाठी विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, शेतकरीकेंद्रित शेती, कौशल्य व संस्कारक्षमकेंद्रित युवक सक्षमीकरण, रिटेल बिझनेसकेंद्रित भारतीय अर्थव्यवस्था, मानवकेंद्रित सहयोगी समाज निर्मिती, हीच माझ्या पुढील आयुष्याची पंचसूत्री आहेत तसेच हेच माझे व्हीजन व मिशन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राचे संस्थापक संचालक डॉ.सुधीर मेश्राम यांनी केले.ग्लोबल बायोटेक फोरम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्लोबल फ्युचरिस्टिक ट्रेंड्स इन लाईफ सायन्स’ आंतरराष्ट्रीय परिसंवादानिमित्त डॉ. सुधीर मेश्राम यांचा कार्यगौरव सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे अध्यक्षस्थानी होते.याप्रसंगी दक्षिण कोरियाचे प्रा. कीम युन हैए, सीईटीवायएस विद्यापीठ मेक्सिको येथील प्रा. स्कॉट वेनेझिया, एनओएए को-आॅपरेटिव्ह रिमोट सेन्सिंग सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी (क्रेस्ट) केंद्र युएसएचे प्रा. तारेंद्र्र लाखनकर, टोकुशिमा जपान विद्यापीठाचे डॉ. पंकज कोईनकर, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. नरेंद्र चौधरी, भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईचे डॉ. संजय जांभूळकर, एलआयटीचे संचालक राजू मानकर, डॉ. अंबिका गायकवाड, डॉ. अर्चना कुळकर्णी, प्रा. पी. जी. चेनगप्पा, डॉ. आर. एच. गुप्ता, डॉ. अनुभूती शर्मा, रातुम नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ. अभय फुलके, डॉ. ज्योत्स्ना सुधीर मेश्राम यांनी विचार व्यक्त केले.संचालन प्रा. चित्रा लाडे, प्रा. रागिणी चांदे, प्रा. सुजाता कांबळे यांनी केले.पुरस्काराची रक्कम आत्महत्याग्रस्तशेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठीयाप्रसंगी डॉ. सुधीर मेश्राम यांचा ग्लोबल बायोटेक फोरमद्वारे १ लक्ष रुपयाचा ‘ग्लोबल बायोटेक एक्सलन्स अवॉर्ड’, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या अवॉर्डची रक्कम नागपूर, अमरावती, वर्धा, धुळे, नंदूरबार, गडचिरोली जिल्ह्यातील १० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयाची रक्कम मदत म्हणून दिली जाईल, असे डॉ. मेश्राम यांनी यावेळी जाहीर केले. परिसंवादाचे संयोजक डॉ. अशोक डोंगरे यांनी मानपत्राचे वाचन केले.

 

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर