कुख्यात सतीश बघेलविरुद्ध पीडितांची पोलिसांकडे गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:07 IST2021-07-04T04:07:28+5:302021-07-04T04:07:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्तात घर मिळवून देण्याची थाप मारून शेकडो जणांना लाखोंचा गंडा घालणारा ...

कुख्यात सतीश बघेलविरुद्ध पीडितांची पोलिसांकडे गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्तात घर मिळवून देण्याची थाप मारून शेकडो जणांना लाखोंचा गंडा घालणारा कुख्यात गुन्हेगार सतीश बघेल (रा. धम्मदीपनगर) याला तातडीने अटक करा आणि आमची रक्कम परत करा, अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात गर्दी केली.
आरोपी बघेल हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्याने वांजरा भागात प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळवून देतो, असे आमिष दाखवून शेकडो जणांकडून लाखो रुपये गोळा केले आणि पळून गेला. त्याने ३० जूनला घराची चावी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र, त्या वेळी तोच गायब झाल्याने त्याच्याकडे लाखो रुपये देणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, संतप्त पीडितांनी यशोधरानगर ठाण्यात आणि नंतर पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्याकडे धाव घेतली. पोलिसांनी पीडितांचे बयाण नोंदवून घेणे सुरू केले असून दुसरीकडे आरोपी बघेलचा शोध सुरू केला आहे.
----