शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत शैक्षणिक प्रदर्शनात विद्यार्थी व पालकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:59 IST

विद्यार्थी आणि पालकांच्या भरघोस प्रतिसादासोबत लोकमत शैक्षणिक प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी झाला. तीन दिवसीय आयोजन रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्राची सर्वांगीण माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजन वर्षातून दोनदा करावे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देशैक्षणिक संस्थांची माहिती एकाच छताखाली   : विभिन्न विद्यापीठ व कोर्सेसची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थी आणि पालकांच्या भरघोस प्रतिसादासोबत लोकमत शैक्षणिक प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी झाला. तीन दिवसीय आयोजन रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्राची सर्वांगीण माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजन वर्षातून दोनदा करावे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांनी लोकमतशी बोलताना दिली.प्रदर्शनात इयत्ता दहावी आणि बारावीत उत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पालकासोबत विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलवर जाऊन विविध कोर्सेस आणि प्रवेशाची माहिती जाणून घेतली. नागपूरसह पुणे, मुुंबई, बेंगळुरू येथील शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलवर आणि स्टेट बँक ऑफ इंडिया व पंजाब नॅशनल बँकेच्या स्टॉलवर देशविदेशातील कर्ज योजनांची माहिती घेतली.विविध कोर्सेस आणि उच्च पगाराच्या रोजगाराची माहिती देण्यासाठी तीन दिवसात संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांतर्फे चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यांनी विविध कोर्सेसच्या बारीकसारीक बाबी आणि प्रवेशावर मार्गदर्शन केले. गुरुवारी सहा चर्चासत्र झाले. त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घेतला.महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शैक्षणिक प्रदर्शनात मेडिकल, इंजिनिअरिंग, फॅशन, ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशन, स्पर्धा परीक्षा, डिझायनिंग, कलात्मकता, आयटी, गेमिंग आणि आर्ट सारख्या विविध कोर्सेसची माहिती एकाच छताखाली देण्यात आली. प्रदर्शनात ३० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांचे स्टॉल होते. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक द युनिक अकॅडमी, सहप्रायोजक एमिटी विद्यापीठ आणि स्टेट बँक बँकिंग पार्टनर होते. रेडियो पार्टनर रेड एफएम आणि डिजिटल पार्टनर अ‍ॅडवॅम्स होते.भाग्यशाली सोडतीचे विजेतेलोकमत शैक्षणिक प्रदर्शनात तीन दिवस भाग्यशाली सोडत काढण्यात आली. अखेरच्या दिवशी कार्तिक विजय कानेकर, सृष्टी भोजेवार, अदिती गडीकर आणि अभय मेश्राम विजेते ठरले. सर्वांना आकर्षक ब्लूटूथ स्पीकर देण्यात आले. याशिवाय चर्चासत्रात विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटEducationशिक्षण