शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:09 IST

तब्बल १.०८ कोटी रुपयांचा खर्च : देवगिरी'सह रवि भवनातील तीन व नाग भवनातील चार कॉटेजची दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महागाईच्या काळात ४० ते ५० लाख रुपयांत चांगले घर उभारले जाऊ शकते; पण मंत्रिमहोदयांचे निवासस्थान असल्यास खर्चदेखील मंत्रिपदासारखाच मोठा असतो, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारातून स्पष्ट होते. रविभवन परिसरातील उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या 'देवगिरी' बंगल्यासह इतर दोन बंगले तसेच नाग भवनातील चार बंगल्यांच्या छतांच्या दुरुस्तीसाठी विभागाने तब्बल १ कोटी ८ लाख २६ हजार ३९८ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

या टेंडरवरून आता वाद निर्माण झाला आहे. 'देवगिरी'च्या कामासाठी मंगळवारी टेंडर उघडण्यात आले. यामध्ये एका ठेकेदाराने 'देवगिरी'चे छत बदलण्याचे काम २१ टक्के कमी दराने (बिलो) घेऊन, अधिकाऱ्यांच्या अंदाजपत्रकावरच प्रश्नचिन्ह लावले आहे. त्यातूनच हे ठेके व अंदाजपत्रके किती वस्तुनिष्ठ आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उर्वरित बंगल्यांचे टेंडर बुधवारी उघडले जाण्याची शक्यता आहे. 

कळीचे मुद्दे

  • हिवाळी अधिवेशनात, रविभवन येथील ३० कॉटेज कॅबिनेट मंत्र्यांना आणि नाग भवन येथील १६ कॉटेज राज्य मंत्र्यांना वाटप केले जातात.
  • ९ मे रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांना वाटप करण्यात आलेल्या रविभवनमधील कॉटेज क्रमांक १३ ची छत कोसळली होती.
  • छत उघडून तपासणी केल्यावर पीओपी चांगल्या स्थितीत आढळली. मात्र त्याच्या वरचा लाकडी सांगाडा (ट्रस) उदळीमुळे खराब झालेला आढळला.
  • १४.१६ लाख रुपये शुल्क न भरल्यामुळे बंगल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होण्यास खूपच उशीर झाला.

 

इतरही कामे केली जाणार

पीडब्ल्यूडीचे अधिकारी हे काम अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत आहेत. टेंडरनुसार छत बदलण्याबरोबरच बंगल्यांचे नूतनीकरणदेखील करण्यात येणार आहे. कारण विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे, त्यामुळे उर्वरित बंगल्यांचे काम त्यानंतर केले जाईल. सरकारच्या 'कॉस्ट डाटा'नुसारच टेंडरचे दर निश्चित करण्यात आले आहेत, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे.

व्हीएनआयटीने दिला होता छत बदलण्याचा सल्ला

पीडब्ल्यूडीच्या विनंतीवरून व्हीएनआयटीने रविभवन आणि नाग भवनमधील बंगल्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यांच्या प्राथमिक अहवालात छतांची स्थिती चिंताजनक असल्याचे नमूद करत तात्काळ बदल करण्याची शिफारस करण्यात आली. अंतिम अहवाल अद्याप येणे बाकी असताना, विभागाने तातडीने हालचाली करत टेंडर प्रक्रिया सुरू केली.

'देवगिरी' सह तीन बंगले पहिल्या टप्प्यात

पहिल्या टप्प्यात रविभवनमधील उपमुख्यमंत्री शिंदे यांचा 'देवगिरी', विधानसभा अध्यक्षांचा बंगला क्र. ९, तसेच विधानपरिषद सभापतींचा बंगला क्र. १८ यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय नाग भवनमधील चार कॉटेजचे कामही प्रस्तावित आहे. नाग भवनमधील एका बंगल्यावर ६० लाख रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे.

टॅग्स :nagpurनागपूरEknath Shindeएकनाथ शिंदेministerमंत्री