पीक विमा योजनेचे तीन कोटी मिळणार

By Admin | Updated: June 25, 2015 03:09 IST2015-06-25T03:09:26+5:302015-06-25T03:09:26+5:30

गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १३,६५५ शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

The Crop Insurance Scheme will get Rs. 3 crores | पीक विमा योजनेचे तीन कोटी मिळणार

पीक विमा योजनेचे तीन कोटी मिळणार

कृ षी समिती : वैयक्तिक लाभाच्या योजनांना मंजुरी
नागपूर : गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १३,६५५ शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यातील नुकसानीचे दावे केलेल्या शेतकऱ्यांना २.९२ कोटीची रक्कम सोमवारपर्यंत मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती आशा गायकवाड यांनी बुधवारी बैठकीनंतर दिली.
पीक विमा व जलयुक्त शिवार योजनेचा बैठकीत आढावा घेण्यात आला. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनांची माहिती दिली.
प्रकल्पावर आधारित विस्तार कार्यक्र माची माहिती जि.प. व पं.स. सदस्यांना व्हावी, यासाठी विशेष भर देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत अन्न सुरक्षा, राष्ट्रीय कृ षी विकास, शेतकऱ्यांना प्रशिक्षण असे विविध कार्यक्र म राबविण्यात येणार आहेत.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर आॅईल इंजिन, मोटारपंप वाटप केले जाते. यासाठी प्रत्येकी २५ लाखाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील संत्रापिकाच्या संरक्षणासाठी ३० लाखाचा निधी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊ स झाला असल्याने पेरणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खते उपलब्ध व्हावीत, बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा बसावा, यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. बोगस विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जात असल्याचे कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील यांनी सांगितले. सदस्य मनोज तितरमारे यांच्यासह समितीचे सदस्य व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: The Crop Insurance Scheme will get Rs. 3 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.