शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उपाययोजना करूनही पीक नष्ट : शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 23:14 IST

Farmer Suicide, Nagpur News प्रतिकूल वातावरण आणि परतीच्या पावसाचा फटका यातून पिकांना वाचविण्यासाठी विविध उपाययाेजना केल्या.परंतु, त्यात यश न आल्याने पीक हातचे गेले आणि हताश झालेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील  गाेंडबाेरी येथील घटना 

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : प्रतिकूल वातावरण आणि परतीच्या पावसाचा फटका यातून पिकांना वाचविण्यासाठी विविध उपाययाेजना केल्या.परंतु, त्यात यश न आल्याने पीक हातचे गेले आणि हताश झालेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडबाेरी येथे गुरुवारी (दि. २२) घडली असून, शुक्रवारी (दि. २३)सकाळी उघडकीस आली.

प्रभाकर रामभाऊ माळवे (४५, रा. गाेंडबाेरी, ता. भिवापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रभाकर यांच्याकडे चार एकर शेती आहे. सततची नापिकी आणि बाजारात शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे ते वैतागले हाेते. याही परिस्थितीत पैशाची जुळवाजुळव करीत त्यांनी साडेतीन एकरात साेयाबीनची पेरणी आणि अर्धा एकरात कपाशीची लागवड केली. मात्र, सततचा व परतीचा पाऊस आणि पिकांवर झालेला किडींचा प्रदुर्भाव यातून पिकांना वाचविण्यासाठी त्यांनी धडपड केली. परंतु त्यात फारसे यश न आल्याने ते हताश झाले. त्यातच त्यांनी गुरुवारी सकाळी शेतात कीटकनाशक प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याnagpurनागपूर