विदर्भात कोरोनाची गंभीर स्थिती; ६,७६२ नव्या रुग्णांची भर, ७४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 09:12 PM2021-03-25T21:12:47+5:302021-03-25T21:14:01+5:30

Nagpur news Coronavirus death toll Coronavirus Cases विदर्भात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णसंख्येचा चढता आलेख खाली येण्याचे नाव घेत नाही आहे. गुरुवारी दैनंदिन रुग्णांची संख्या ६,७६२ झाली तर, ७४ रुग्णांचे बळी गेले.

Critical condition of corona in Vidarbha; Addition of 6,762 new patients, 74 deaths | विदर्भात कोरोनाची गंभीर स्थिती; ६,७६२ नव्या रुग्णांची भर, ७४ मृत्यू

विदर्भात कोरोनाची गंभीर स्थिती; ६,७६२ नव्या रुग्णांची भर, ७४ मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : विदर्भात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णसंख्येचा चढता आलेख खाली येण्याचे नाव घेत नाही आहे. गुरुवारी दैनंदिन रुग्णांची संख्या ६,७६२ झाली तर, ७४ रुग्णांचे बळी गेले. (Coronavirus death toll)  नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात नागपूरसह आता वर्धा, चंद्रपूर व भंडाऱ्यात रुग्ण वाढू लागले आहेत. तर, अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्यात झपाट्याने रुग्ण वाढत असून चार जिल्ह्यात रुग्णसंख्या ३०० ते ४५० दरम्यान दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात ३५७९ नव्या बाधितांची भर पडली तर या वर्षातील सर्वाधिक ४७ रुग्णांचे मृत्यू झाले.

बुलढाणा जिल्ह्यात ७७३ रुग्ण व ५ रुग्णांचे बळी गेले. अमरावती जिल्ह्यात ४३९ रुग्ण आढळून आले असून ५ रुग्णांचे मृत्यू झाले. अकोला जिल्ह्यातही ४३९ नव्या रुग्णांची भर पडली तर १ रुग्णाचा जीव गेला. अमरावती जिल्ह्यात ३४२ रुग्ण व ६ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात ३०६ रुग्ण व ४ बळी, वर्धा जिल्ह्यात २५१ रुग्ण व ४ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात २४५ रुग्ण व २ मृत्यू, भंडारा जिल्ह्यात २४४ रुग्ण, गोंदिया जिल्ह्यात ८८ तर गडचिरोली जिल्ह्यात ५६ रुग्णांची नोंद झाली.

जिल्हा : रुग्ण : ए.रुग्ण : मृत्यू

नागपूर : ३५७९ : २०७०६७: ४७

गोंदिया :८८: १५३३० : ००

भंडारा :२४४ : १५८६५ : ००

चंद्रपूर :२४५: २६४८९:०२

वर्धा : २५१ : १७४८७: ०४

गडचिरोली :५६ : १०३२८ : ००

अमरावती : ३४२ : ४६९९७ : ०६

यवतमाळ :४३९ : २६२७५: ०५

वाशिम :३०६ : १३९९४: ०४

बुलढाणा :७७३ : ३३१०२: ०५

अकोला : ४३९: २५९५३ : ०१

Web Title: Critical condition of corona in Vidarbha; Addition of 6,762 new patients, 74 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.