शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

अधिवेशनाच्या धामधुमीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयाने वाचविले चिमुकल्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:40 IST

चिमुकल्या जीवाला तात्काळ उपचार मिळावेत म्हणून त्याच्या आईवडिलांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याच कार्यालयात फोन लावला आणि अवघ्या काही मिनिटात उपचार सुरू होऊन बाळाचे प्राण वाचल्याची हृद्य घटना नागपूर येथे सोमवारी घडली.

ठळक मुद्देएका फोनसरशी लगेच मिळाले उपचारगडकरींचे कार्यालय झाले भावनिकगडकरींनी दिल्या विशेष सूचना

आॅनलाईन लोकमतनागपूर : स्थळ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे रामनगरातील कार्यालय. वेळ : दुपारी १ ची. एक फोन खणाणला. एरवी बदली, कर्जमंजुरी, अडलेली शासकीय कामे यासाठी कार्यालयात फोन सुरूच असतात. पण, हा फोन जरा वेगळा होता. पलीकडून आवाज आला... माझ्या मुलाला वाचवा, त्याला तत्काळ उपचाराची गरज आहे. गडकरींचे स्वीय सचिव अतुल मंडलेकर फोनवर होते. ही भावनिक साद ऐकून अवघे कार्यालय हादरले. मंडलेकर यांनी याबाबत लगेच सूत्रे हलवली आणि पुढच्या तासाभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्या चिमुकल्यावर उपचार सुरू झाले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. अन्यथा त्याचे प्राण धोक्यात आले असते. सोमवारी घडलेला हा प्रसंग नेमका असा घडला. संततीसुख लाभणार म्हणून जळगाव जामोद येथील आगरकर दाम्पत्य प्रचंड आनंदात होते. अखेर तो दिवस आला. त्यांना पुत्ररत्न झाले. परंतु दुर्दैवाने जन्मासोबतच त्याच्या डोक्याला एक मोठी गाठ होती. त्यांनी अकोल्यात डॉक्टरला दाखवले. त्यांनी ताबडतोब नागपूरला हलविण्याची सूचना केली. या चिमुकल्याचे वडील प्रकाश आगरकर पत्नीसह नागपुरात दाखल झाले. धावपळ करीत मेडिकल गाठले. परंतु तोपर्यंत दुपार झाली होती. ओपीडीची वेळ संपली होती. डॉक्टरांनी मुलाला दाखल करून घेण्यास नकार दिला. उपाशापोटी हे दाम्पत्य निराश अवस्थेत मेडिकल बाहेर पडले. पण, या अनोळखी शहरात पाच दिवसांच्या चिमुकल्याला घेऊन जावे तरी कुठे त्यांना कळेचना. अखेर त्यांनी नागपुरातील एका नातेवाईकाला फोन लावला. त्यांनी प्रकाश आगरकर यांचे बोलणे गडकरींच्या कार्यालयात करून दिले. मंडलेकर यांनी मेडिकलला फोन लावला. गरीब रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवणाऱ्यांची खरडपट्टी काढली. अवघे मेडिकल प्रशासन हादरले, लगेच कामाला लागले. प्रकाश आगरकर यांना बोलावून त्यांच्या मुलाला दाखल करून घेण्यात आले. इकडे उपचार सुरू झाले अन् तिकडे या चिमुकल्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पसरले.गडकरी म्हणाले, आधी बाळाचे बघाइकडे गडकरींच्या कार्यालयात ही भावनिक धडपड सुरू असताना दिल्लीहून गडकरी यांचा फोन आला. मंडलेकर यांनी त्यांना हा प्रकार सांगताच ते गहिवरले. त्यांनी सूचना केल्या, हातातली सगळी कामे बाजूला सारा. ती नंतरही होत राहतील. या बाळाचे आधी बघा. त्याला काय वैद्यकीय उपचाराची गरज आहे, याकडे जातीने लक्ष द्या आणि बाळाच्या प्रकृतीची इत्थंभूत माहिती मला कळवत रहा.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Healthआरोग्य