संकट संपता संपत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:04+5:302021-04-07T04:09:04+5:30
सावनेर/काटोल/नरखेड/हिंगणा/कळमेश्वर/कामठी/कुही/ मौदा/ रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला सध्या कोरोनाने विळखा घातला आहे. तालुक्यात मंगळवारी आणखी ११०० रुग्णांची नोंद ...

संकट संपता संपत नाही!
सावनेर/काटोल/नरखेड/हिंगणा/कळमेश्वर/कामठी/कुही/ मौदा/ रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला सध्या कोरोनाने विळखा घातला आहे. तालुक्यात मंगळवारी आणखी ११०० रुग्णांची नोंद झाली. सोबतच २१ रुग्णांचा मृत्यू झाला. सावनेर तालुक्यात १६०१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आली. तीत ४५१ जणांना कोराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तालुक्यात ४ रुग्णांचा मृत्यू झाला. सावनेर शहरात १८५ तर ग्रामीणमध्ये २६६ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात संक्रमण साखळी अधिक मजबूत झाली आहे. तालुक्यात १९३ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ११२ तर ग्रामीण भागातील ८१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये कोंढाळी येथे दहा, कलंबा, येनवा येथे प्रत्येकी ९, केदारपूर (७), झिल्पा (५), रिधोरा (४), सावळी (बु.), वाढोणा, मेंडकी, मसली, पारडसिंगा, दिग्रस येथे प्रत्येकी तीन, लाडगाव, कोहळी, मेंढेपठार (जंगली), मेंढेपठार, लिंगा ,खानगाव, कोहळा येथे प्रत्येकी दोन तर पंचधार, चारगाव, दुधाळा, धुरखेडा, पानवाडी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यात १३५ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर- ब्राह्मणी शहरात ३५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात गोंडखैरी येथे २८, तिष्टी बु (१४), मोहपा (८), निमजी खदान (६), केतापार, उबाळी, तेलकामठी येथे प्रत्येकी ५, धापेवाडा, तेलगाव येथे प्रत्येकी ४, आष्टीकला, तिष्टी खु, लिंगा, परसोडी येथे प्रत्येकी तीन, तर वरोडा, धुरखेडा,खानगाव,खैरी हरजी, खापरी, कोहळी, घोराड, कन्याडोल, सोनुली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात १११५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १७४ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात वानाडोंगरी येथे ६४, हिंगणा (२६), डिगडोह (२४), निलडोह (१६), इसासनी व रायपूर प्रत्येकी १०, मेटाउमरी (६), खापरी गांधी (४), येरणगाव (३) तर किन्ही धानोली, मांडव घोराड, देवळी सावंगी, मोहगाव, उमरीवाघ, टाकळघाट, आगरगाव, मोंढा, कवडस, टेंभरी व कान्होलीबारा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
मौदा तालुक्यात ३३ रुग्णांची भर तर दोघांचा मृत्यू झाला. तालुक्यात आतापर्यंत १३०६ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ९१८ रुग्ण बरे झाले आहेत. ३५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कुही तालुक्यात ७७४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथे १४, मांढळ (१८), वेलतुर (३२),बोरी-सदाचार (३०), तितुर (५) तर साळवा येथे दोन रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात १३६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २३ तर ग्रामीण भागातील ११३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये दाहोदा येथे सर्वाधिक २३ रुग्णांची नोंद झाली.
नरखेड शहराला दिलासा
नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण अधिक आहे. ग्रामीण भागात मंगळवारी ५२ रुग्णांची नोंद झाली. शहरात केवळ तीन रुग्ण आढळले. तालुक्यातील ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४३२ तर शहरातील ६४ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत ४३, मेंढला (५) तर जलालखेडा येथे ४ रुग्णांची नोंद झाली.
कामठीत अंगणवाडी सेविकेचा मृत्यू
कामठी नगरपरिषद प्रभाग १५ रामगड येथील अंगणवाडी सेविका लक्ष्मी रामकृष्ण ऊके (५०) यांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृत पावलेल्या अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबीयांना सरकारने मदत करावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे.