दुबार पेरणीचे संकट
By Admin | Updated: July 5, 2014 02:09 IST2014-07-05T02:09:51+5:302014-07-05T02:09:51+5:30
४ जुलैपर्यंत जिल्ह्यात जेमतेम ७८.२६ मि.मी. पाऊ स झाला. सरासरीच्या तुलनेत ३६.३० टक्के पाऊ स झाला आहे.

दुबार पेरणीचे संकट
नागपूर : ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात जेमतेम ७८.२६ मि.मी. पाऊ स झाला. सरासरीच्या तुलनेत ३६.३० टक्के पाऊ स झाला आहे. पुढील दोन-तीन दिवसात चांगला पाऊ स न झाल्यास ३० ते ४० टक्के पेरण्या दुबार कराव्या लागतील, अशी शक्यता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
अद्याप चांगला पाऊ स झालेला नाही. कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार १५ जुलैपर्यंत सोयाबीन व कपाशीची पेरणी करता येईल. अद्याप पेरणीची वेळ निघून गेलेली नाही. जिल्ह्यात सर्वत्र पाऊ स झालेला नाही. कुठे चांगला पाऊ स झाला, पण बाजूच्या क्षेत्रात पाऊ स नसल्याचे चित्र आहे. पुढील तीन-चार दिवसात चांगला पाऊ स न झाल्यास ४० टक्के दुबार पेरणी करावी लागेल, अशी शक्यता वर्र्तविली जात आहे.
खरीप हंगामासाठी ५,०९९१६ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यात कापूस १,५०,००० तर सोयाबीनच्या १,९२५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मागील वर्षाच्या हंगामात जिल्ह्यात ४,८३,६४० हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती. यात कापूस १,२४,६६५ तर सोयाबीनच्या २,२२,४४८ हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. तसेच ७८,८१२ हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड करण्यात आली होती. यावर्षी ८५,००० हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात अद्याप मान्सून सक्रि य झालेला नाही. वळव्याच्या पावसासारखा पाऊ स पडत आहे. पावसाला विलंब होत असला तरी कापूस व सोयबीनची पेरणी १५ जुलैपर्यंत शक्य आहे. ज्या शेतकऱ्याकडे ओलिताची साधने आहेत त्यांनी पेरणी करायला हरकत नाही. पेरणीजोगा पाऊ स झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)