शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:56 IST

जून महिन्याच्या शेवटीशेवटी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात गेली. गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात ५२.१७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पण आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे घोंगावत आहे. विशेष म्हणजे अजूनही ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ५२ टक्के पेरण्या आटोपल्या : सरासरीच्या २४ टक्के पाऊस कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिन्याच्या शेवटीशेवटी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात गेली. गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात ५२.१७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पण आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे घोंगावत आहे. विशेष म्हणजे अजूनही ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत.गेल्या १५ दिवसात जिल्ह्यातील सुमारे ५२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात कापूस प्रथम व सोयाबीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत झालेल्या पेरणीतील सुमारे ६५ टक्के क्षेत्र हे कापसाने व्यापले आहे. तर पावसामुळे अद्यापही भात पिकाच्या रोवणीला सुरुवात झाली नाही. जिल्ह्यात खरिपाचे एकूण ५ लाख ७ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे. त्यातील ४ लाख ७९ हजार २१० हेक्टर क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे आहे. कापसाचे एकूण नियोजित क्षेत्र हे २ लाख २५ हजार हेक्टर आहे. सोयाबीनचे १ लाख हेक्टर व भात पिकाचे ९४ हजार २०० हेक्टर इतके असे क्षेत्र आहे. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे भाकित वर्तविले होते. परंतु, हवामान खात्याचा हा अंदाज चुकला. पावसाचे आगमन यंदाही उशिराच झाले. गेल्यावर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकऱ्यांनी यंदा सावध भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घ्यावा आणि पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्या अनुषंगे ४८ टक्के क्षेत्रावर अद्यापही पेरण्या झालेल्या नाहीत. भात पिकासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने भाताच्या पेरण्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहे.जुलै महिना पावसाचा असतो. परंतु, अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून विदर्भात तुलनेने फारच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता लागली आहे. तरीसुद्धा आजवर म्हणजेच ११ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी साधारणत: २९६.४ मिलिमीटर इतका पाऊस पडत असतो. मात्र, यंदा १ जून ते ११ जुलैपर्यंत केवळ २२५ मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत सुमारे २४ टक्क्याने कमी आहे.आजवर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ५२.१७ टक्के म्हणजेच २ लाख ५० हजार ०२० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात कापसाची १ लाख ६४ हजार १२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची ४८ हजार ८२७ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तुरीची ३३ हजार २३७ हेक्टरवर तर ज्वारीची १३०६.६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आतापर्यंत धानाने एकूण २५२४.६३ हेक्टर तर डाळींनी ३३ हजार ७४४ हेक्टर इतके क्षेत्र व्यापले आहे.अद्यापतरी संकट नाहीजून महिन्याच्या शेवटीशेवटी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. पण आणखी १० दिवस पावसाला उशीर झाल्यास नक्कीच फटका बसू शकतो. मुळात मान्सूनला उशीर झाल्याने यावर्षी पेरण्या उशिरा सुरू झाल्या. त्यामुळे टक्केवारी कमी आहे. त्यात भात पिकांसाठी अपेक्षित पाऊस न झाल्याने भाताच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधिकारीदुबार पेरणीचे संकट आहेचहवामान खात्याचे अंदाज यावर्षी चुकीचे ठरत आहेत. जो काही पाऊस झाला आणि त्यात ज्या पेरण्या झाल्या त्या पिकांना पाऊस थांबल्यामुळे फटका बसणारच आहे. पण ज्यांनी अजूनही पेरण्या केल्या नाहीत, त्यांनी १५ जुलैनंतर पेरण्या केल्यास २५ टक्के उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार आहे. कारण पेरणीचा एक विशिष्ट हंगाम असतो आणि त्या हंगामात पेरणी होऊ शकली नाही.श्रीधर ठाकरे, कृषीतज्ज्ञ

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती