पाणी मागितले तर गुन्हे दाखल होतात !

By Admin | Updated: May 19, 2015 01:50 IST2015-05-19T01:50:18+5:302015-05-19T01:50:18+5:30

पाणीपुरवठ्यात असलेली अनियमितता, दूषित पाणी व पाणी मागणाऱ्या नगरसेवकांवर ओसीडब्ल्यूतर्फे दाखल केले

Criminals get water if you ask for water! | पाणी मागितले तर गुन्हे दाखल होतात !

पाणी मागितले तर गुन्हे दाखल होतात !

ओसीडब्ल्यूचा करार रद्द करा : विरोधकांसह सत्ताधारी सहकाऱ्यांचाही टाहो
नागपूर :
पाणीपुरवठ्यात असलेली अनियमितता, दूषित पाणी व पाणी मागणाऱ्या नगरसेवकांवर ओसीडब्ल्यूतर्फे दाखल केले जाणारे गुन्हे, या मुद्यांवरून सोमवारी महापालिकेच्या सभेत विरोधकांनी रान उठवले. विशेष म्हणजे बसपा व सत्तेत सहभागी असलेल्या सहयोगी पक्षांच्या नगरसेवकांनीही यात साथ दिल्याने विरोधकांना चांगलेच बळ मिळाले.

महापालिकेत भाजपची सत्ता असताना पाणी मागणाऱ्या भाजपच्या तब्बल सात नगरसेवकांवर ओसीडब्ल्यूतर्फे गुन्हे दाखल केले जातात, तर सामान्य माणसांचे काय ? आम्ही पाणीही मागायचे नाही का, असा सवाल करीत विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्यासह विरोधकांनी महापौर प्रवीण दटके यांच्या आसनासमोर ओसीडब्ल्यू विरोधात बॅनर झळकवत ओसीडब्ल्यूचा करार रद्द करण्याची मागणी केली.
या संबंधीचा प्रस्ताव पुढील सभेत आणावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली.
महापौरांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे विरोधकांनी महापौरांच्या विरोधातच नारेबाजी सुरू केली. या गोंधळात महापौरांनी विषय पत्रिकेवरील विषय पुकारून विनाचर्चेने पटापट मंजूर करून घेतले. (प्रतिनिधी) सविस्तर वृत्त/ ८ वर

असलम खान, गजभिये आक्रमक
भाजपसोबत सत्तेत सहयोगी पक्ष असलेल्या मुस्लिम लीगचे नगरसेवक असलम यांनी ओसीडब्ल्यू विरोधात आक्रमक भूमिका मांडली. पाण्यासाठी लोक आमच्या घरावर येतात. शिवीगाळ करतात. त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचे, असा सवाल त्यांनी महापौरांना केला तर बसपाचे किशोर गजभिये हे एका बाटलीत दूषित पाणी घेऊन आले होते. त्यांनी ओसीडब्ल्यूवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे राजू नागुलवार यांनी ओसीडब्ल्यूचे आॅडिट करण्याची मागणी केली.

ओसीडब्ल्यूने यांच्यावर
केले गुन्हे दाखल
 प्रवीण भिसीकर (भाजप)
 देवेंद्र मेहेर (भाजप)
 डॉ. छोटू भोयर (भाजप)
 जगतराम सिन्हा (शिवसेना)
 रमेश पुणेकर (भाजप)
 कमलेश चौधरी
(अपक्ष- माजी नगरसेवक)
 महेंद्र बोरकर (काँग्रेस)

सत्ताधारी नगरसेवकही ओसीडब्ल्यूवर नाराज
सभेत विरोधक ओसीडब्ल्यू विरोधात आवाज उठवित असताना काही सत्ताधारी व सहयोगी पक्षातील नगरसेवकांनी बाका वाजवून समर्थन केले. काँग्रेसने हा विषय लावून धरल्यामुळे सत्ताधारी नगरेवकांनी सभागृहात या विषयावर बोलणे टाळले. मात्र, सभेनंतर अनेकांनी पत्रकारांशी खासगीत बोलताना ओसीडब्ल्यूच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. आता तर आम्हाली ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर जायची भिती वाटते, अशी धास्ती त्यांनी बोलून दाखविली. विशेष म्हणजे यात ओसीडब्ल्यूने गुन्हे दाखल केलेल्या काही नगरसेवकांचा समावेश होता.

Web Title: Criminals get water if you ask for water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.