शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या वादातून गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या, तीन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 10:47 IST

कळमना वस्तीतील घटना

नागपूर : दारूच्या वादातून एका कुख्यात गुन्हेगाराची तीन आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केली. कळमना वस्तीतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आतिश ऊर्फ बाबा वरफाटा राजाराम ठाकरे (२६,लाभलक्ष्मी ले आऊट, कळमना वस्ती) असे मृताचे नाव आहे.

सोमवारी सकाळी त्याचा वस्तीतील मंदिराजवळील मोकळ्या जागेत मृतदेह आढळला. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक पोहोचल्यावर संबंधित मृतदेह आतिशचा असल्याची बाब स्पष्ट झाली. पोलिसांनी लगेच तपास यंत्रणा कामाला लावली व तीन तासांत आसीफ इम्तियाज अली (२१, कळमना वस्ती), सोहेल ऊर्फ अन्नू प्यारे शेख (२२, पावनगाव रोड, कळमना) व राहुल बंडू बागडे (१९, लाभलक्ष्मीनगर) या आरोपींना अटक केली.

आतिश ठाकरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता व त्याच्यावर मारहाण, चोरीसह सहा गुन्हे दाखल होते. त्याला तडिपारदेखील करण्यात आले होते. काही दिवसांअगोदर त्याचा आसिफसोबत दारू पिण्यावरून वाद झाला होता. रविवारी रात्री नऊ वाजता तीनही आरोपी आतिशच्या घरी आले व त्यांनी त्याला दारू पिण्यासाठी सोबत नेले. आतिशदेखील लगेच त्यांच्यासोबत गेला. दत्तनगरातील शिव मंदिराजवळ चौघेही दारू पित बसले होते.

दारू संपल्यानंतर आतिशला दारूसाठी पैसे मागितले असता त्याने शिवीगाळ केली. त्यातून वाद वाढला व तीनही आरोपींनी आतिशला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचा दगडाने ठेचून खून केला. त्याचा मृत्यू झाल्यावर तिघेही घटनास्थळावरून फरार झाले. सकाळी वस्तीतील लोकांना त्याचा मृतदेह दिसला. पोलिसांनी चौकशी केली असता आतिश तिघांसोबत गेल्याची बाब समोर आली. त्यानंतर काही वेळातच तीनही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर