शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

संजय निरुपम यांच्याविरुद्धचे फौजदारी प्रकरण खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 19:32 IST

मुंबई येथील माजी खासदार संजय निरुपम यांच्याविरुद्धचे एक गंभीर फौजदारी प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणांमुळे रद्द केले आहे. हे प्रकरण भंडारा येथील असून, त्यात निरुपम यांच्यावर दंगा घडविण्याच्या उद्देशाने जमावाला चिथावणी देणे, धार्मिकस्थळांचे नुकसान करणे, धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणे इत्यादी गंभीर आरोप लावण्यात आले होते.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णयजमावाला चिथावणी देण्याचा होता आरोप

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबई येथील माजी खासदार संजय निरुपम यांच्याविरुद्धचे एक गंभीर फौजदारी प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणांमुळे रद्द केले आहे. हे प्रकरण भंडारा येथील असून, त्यात निरुपम यांच्यावर दंगा घडविण्याच्या उद्देशाने जमावाला चिथावणी देणे, धार्मिकस्थळांचे नुकसान करणे, धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणे इत्यादी गंभीर आरोप लावण्यात आले होते. या निर्णयामुळे निरुपम यांना मोठा दिलासा मिळाला आहे.न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी हा निर्णय नुकताच दिला. संबंधित गुन्ह्यांमध्ये तीन वर्षे कारावासाची कमाल शिक्षा आहे. एफआयआर १५ सप्टेंबर २००४ रोजी नोंदविण्यात आला होता. त्यामुळे १५ सप्टेंबर २००७ पूर्वी दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांनी निरुपम यांच्याविरुद्ध तीन वर्षांपेक्षा जास्त विलंबाने जेएमएफसी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्या विलंबाचे ठोस कारण शासनाला सांगता आले नाही. तसेच, जेएमएफसी न्यायालयाने दोषारोपपत्राचा विलंब क्षमापित करताना समाधानकारक कारणे दिली नाही, असे उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट केले. जेएमएफसी न्यायालयाने दोषारोपपत्राचा विलंब क्षमापित करण्याचा वादग्रस्त आदेश २८ एप्रिल २०१५ रोजी दिला होता. तो आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. परिणामी फौजदारी प्रकरणही रद्द झाले आहे.असे आहे प्रकरणनिरुपम यांनी १५ सप्टेंबर २००४ रोजी भंडारा येथे विनापरवानगी निवडणूकपूर्व सभा घेतली होती. पाचशेवर नागरिक सभेत उपस्थित होते. दरम्यान, धार्मिक भावना दुखावणारे नारे देण्यात आले. नागरिकांना दंगा घडविण्यासाठी चिथावणी देण्यात आली. परिणामी, निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी त्याच दिवशी निरुपम यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १५३, २९५, २९८, ५०५, ५०५ (२) व लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ अंतर्गत एफआयआर नोंदविला व २३ डिसेंबर २०१० रोजी जेएमएफसी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यासोबत तीन वर्षांचा विलंब क्षमापित करण्याचा अर्जही सादर करण्यात आला होता. जेएमएफसी न्यायालयाने २८ एप्रिल २०१५ रोजी तो अर्ज अवैधरीत्या मंजूर केला होता. 

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय