क्राईम सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST2021-07-08T04:07:20+5:302021-07-08T04:07:20+5:30

नागपूर : कोराडी पोलिसांनी शस्त्र जवळ बाळगून दरोडा टाकण्याची योजना आखणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. योगेश सिद्धार्थ खंदारे (२३) ...

Crime single | क्राईम सिंगल

क्राईम सिंगल

नागपूर : कोराडी पोलिसांनी शस्त्र जवळ बाळगून दरोडा टाकण्याची योजना आखणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. योगेश सिद्धार्थ खंदारे (२३) रा. इंदोरा, मनीष मनोहर वाघमारे (२८) रा. श्रावस्तीनगर, ऋषभ खुशाल घोरे (२४) रा. हुडको कॉलनी, प्रीतम राजेंद्र इंदूरकर (३०) रा. जरीपटका आणि विक्की विनोद हनवते (२०) रा. कोराडी, अशी आरोपींची नावे आहेत. कोराडीच्या सुरादेवी गावाजवळ आरोपींना संशयास्पद अवस्थेत अटक करण्यात आली. तपासणी केली असता त्यांच्याजवळ शस्त्र आणि दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य आढळले. आरोपींविरुद्ध दरोडा टाकण्याची तयारी तसेच शस्त्रविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

..........

हरविलेले मोबाईल परत करणार पोलीस

नागपूर : सायबर सेल नागरिकांचे हरविलेले १२५ मोबाईलचा पत्ता लावून ते गुरुवारी ८ जुलैला परत करणार आहे. काटोल मार्गावरील मुख्यालयाच्या अलंकार सभागृहात सायंकाळी ५ वाजता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर आयुक्त सुनील फुलारी तसेच उपायुक्त विवेक मसाळ नागरिकांना मोबाईल परत करणार आहेत. हे मोबाईल ३७.५० लाखांचे आहेत.

............

Web Title: Crime single