क्राईम सिंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST2021-02-07T04:09:27+5:302021-02-07T04:09:27+5:30
नागपूर : सीताबर्डीच्या कोष्टीपुरा परिसरात एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. स्नेहल अशोक इटनकर (३०) रा. हनुमान गल्ली ...

क्राईम सिंगल
नागपूर : सीताबर्डीच्या कोष्टीपुरा परिसरात एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. स्नेहल अशोक इटनकर (३०) रा. हनुमान गल्ली असे युवकाचे नाव आहे. स्नेहलने २२ जानेवारीला विषारी औषध प्राशन केले होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यास कुटुंबीयांनी दवाखान्यामध्ये दाखल केले. तेथे उपचारादरम्यान ६ फेब्रुवारीला शनिवारी सकाळी ११.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
.................
युवतीची राजस्थानमध्ये विक्री
नागपूर : इमामवाडा परिसरातील एका ३० वर्षीय युवतीची फसवणूक करून तिला राजस्थानात विकल्याची घटना समोर आली आहे. आरोपीत इंदोरा येथील रहिवासी काजल (३५) आणि आलोक बोटमांगे (४०) रा. गड्डीगोदाम यांचा समावेश आहे. फिर्यादीच्या मुलीची काजल सोबत ओळख होती. डिसेंबर २०२० मध्ये काजल आणि आलोक यांनी तिला राजस्थानात फिरण्यासाठी जाऊ असे सांगितले. २३ डिसेंबरला युवती आरोपींसोबत राजस्थानला गेली. त्यानंतर ती घरी परतली नाही. कुटुंबीयांचा आरोपींसोबत संपर्कही होत नव्हता. राजस्थानमध्ये आरोपींनी २ लाखात युवतीला विकून जबरदस्ती तिचे लग्न लावून दिले. फिर्यादीच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
.............
भांडेवाडीत दुचाकी जाळली
नागपूर : पारडीच्या भांडेवाडी परिसरात वादातून एका आरोपीने शेजाऱ्याच्या पुतण्याची दुचाकी पेटविली. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. अनुराग ऊर्फ उमेश चुडामणी दुबे (३७) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजता शारदा चौक येथील रहिवासी हिरा आंबोलीकर (४०) सोबत आरोपी दुबे याने वाद घातला. त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर रात्री आरोपी दुबेने आंबोलीकर यांच्या पुतण्याची दुचाकी क्रमांक एम. एच. ४९-बीजे-५६८४ ला आग लावली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
.............