‘क्राईम ग्राफ’ वाढतोय...

By Admin | Updated: February 4, 2015 01:00 IST2015-02-04T01:00:47+5:302015-02-04T01:00:47+5:30

राज्याची उपराजधानी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ या वर्षात बहुतांश गुन्ह्यांमध्ये वाढ झाली.

'Crime graph' is growing ... | ‘क्राईम ग्राफ’ वाढतोय...

‘क्राईम ग्राफ’ वाढतोय...

वर्षभरात ११५ बलात्कार : ३ हजारांवर चोरीच्या प्रकरणांची नोंद
नागपूर : राज्याची उपराजधानी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ या वर्षात बहुतांश गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. २०१४ मध्ये शहरात ११५ बलात्कार, १४५ अपहरण तर १०३ हत्येच्या घटनांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१३ व २०१४ या वर्षांत नागपूरमध्ये झालेल्या गुन्ह्यांबाबत विचारणा केली होती. यावर नागपूर पोलिसांनी विस्तृत माहिती उपलब्ध करून दिली. २०१३ मध्ये शहरात ८ हजार ३६६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २०१४ मध्ये हाच आकडा ८ हजार ८१७ पर्यंत गेला. यातील ४ हजार ९२४ म्हणजेच केवळ ५६ टक्के गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांना शक्य झाले.
‘चेन स्नॅचिंग’च्या २५६ घटना
शहरात दिवसेंदिवस ‘चेन स्नॅचिंग’चे प्रमाण वाढीस लागत आहे. २०१४ मध्ये सोनसाखळी हिसकावल्याच्या २५६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यातील केवळ ३३ टक्के प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात आली. २०१३ मध्ये लुटमारीचा आकडा २४८ इतका होता.
महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ
शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये २०१४ या वर्षात वाढ दिसून आली. २०१४ मध्ये ११५ महिलांवर बलात्कार झाल्याची प्रकरणे नोंदविण्यात आली. २०१३ च्या तुलनेत हा आकडा २५ ने अधिक आहे. तर १७८ बालके व महिलांचे अपहरण करण्यात आले.
८ गुन्हेगार टोळ्या गजाआड
शहरातील निरनिराळ्या भागांत गुन्हेगारी टोळ््या निर्माण झाल्या आहेत. २०१३ व २०१४ मध्ये ८ गुन्हेगार टोळ््यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. यात एकूण ५६ गुन्हेगार होते. शिवाय २ वर्षांत १३४ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले.

Web Title: 'Crime graph' is growing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.