अत्याचाराचा गुन्हा हायकोर्टातही सिद्ध
By Admin | Updated: July 18, 2014 01:06 IST2014-07-18T01:06:21+5:302014-07-18T01:06:21+5:30
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा सरकारी पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही सिद्ध करण्यात यश मिळाले. न्यायालयाने आरोपीची १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली.

अत्याचाराचा गुन्हा हायकोर्टातही सिद्ध
दहा वर्षे कारावास : बुलडाणा जिल्ह्यातील घटना
नागपूर : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा सरकारी पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही सिद्ध करण्यात यश मिळाले. न्यायालयाने आरोपीची १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील आहे.
विजय प्रल्हाद वरणकर (४५) असे आरोपीचे नाव असून तो तामगाव, ता. संग्रामपूर येथील रहिवासी आहे. खामगाव सत्र न्यायालयाने २४ जुलै १९९८ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३७६(२)(फ) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड, तर कलम ३४२ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्ती एम.एल. तहलियानी यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
आरोपी व पीडित मुलगी कविता (काल्पनिक नाव) एकमेकांचे शेजारी होते. घटनेच्या काळात कविताचे वय ८ वर्षे होते. २० जुलै १९९३ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास विजयने कविताला घरी बोलावून अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले होते. शासनातर्फे एपीपी तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)