शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा : भाजप नगरसेवकासह ८ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:12 IST

भाजपच्या एका विद्यमान नगरसेवकासोबत ८ जुगाऱ्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर, अत्रे ले-आऊट येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ ने धाड टाकली. आरोपींकडून १९ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्दे२० लाखाचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपच्या एका विद्यमान नगरसेवकासोबत ८ जुगाऱ्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर, अत्रे ले-आऊट येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ ने धाड टाकली. आरोपींकडून १९ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतलल्या भाजप नगरसेवकाचे नाव प्रवीण विलासराव भिसीकर (४०, रा. तीन नल चौक, कसारपुरा) असून ते प्रभाग क्रमांक ५ (ब) चे नगरसेवक आहेत. हा जुगार अड्डा अत्रे ले-आऊट एनआयटी गार्डनजवळील संजय लाटकर याच्या घरी सुरू होता. यासंदर्भात गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेने रचलेल्या सापळ्यात ८ आरोपी जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. आरोपींमध्ये संजय भाऊराव कुराडे (५४, रा. मंगलधाम सोसायटी, टाकळी सिम), नरेंद्र व्यंकटराव मेश्राम (४६, रा. ८५ प्लॉट, जोगीनगर), प्रवीण मनोहर पराते (३३, रा. विणकर कॉलनी, मानेवाडा रोड), सुरेश महादेवराव भोयर (५४, रा. धोटे ले-आऊट), नीलेश केशवराव मोहाडीकर (३४, रा. विणकर कॉलनी), रमेश रूपलाल जाधव (५४, रा. एच.बी. इस्टेट, सोनेगाव), ज्ञानेश्वर नत्थूजी धार्मिक (४२, रा. साईनगर, जयताळा) यांचा समावेश आहे. आरोपींकडून रोख १०२०० रुपये, ७ मोबाईल फोन, ३ चारचाकी व २ दुचाकी असा १९ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सह पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार, किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पंकज धाडगे, रफीक खान, प्रशांत लाडे, अनिल दुबे, शैलेश पाटील, अरुण धर्मे, श्याम कडू, अमित पात्रे, प्रवीण गोरटे, मो. शारीफ, राजू पोतदार यांचा समावेश होता.

टॅग्स :Policeपोलिसraidधाड