क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST2021-07-22T04:07:13+5:302021-07-22T04:07:13+5:30

नीलेश ऊर्फ बबलू जगलाल जयस्वाल (४५) रा. २०३, विजयलक्ष्मी अपार्टमेंट, वैशालीनगर, पाचपावली असे आरोपीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ...

Crime Branch raids on cricket betting | क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेची धाड

क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेची धाड

नीलेश ऊर्फ बबलू जगलाल जयस्वाल (४५) रा. २०३, विजयलक्ष्मी अपार्टमेंट, वैशालीनगर,

पाचपावली असे आरोपीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बबलू जयस्वाल हा बिनधास्त क्रिकेटवर सट्टेबाजी करीत होता. मंगळवारी भारत विरुद्ध श्रीलंका संघादरम्यान सुरू असलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यावर जयस्वाल सट्टेबाजी करीत होता. त्यासाठी क्रिकेट माझा, ११ लाईव्ह लाईन अँड फास्टर आयपीएल स्कोर नावाचे अ‍ॅप शेअर करून खायवाडी करीत होता. लाखोमध्ये सुरू असलेल्या या जुगाराची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक संदिपान पवार यांना मिळाली. पोलीस हवालदार रामचंद्र कारेमोरे, प्रवीण गोरटे, संदीप मावलकर आणि मिलिंद चौधरी यांनी जयस्वालच्या घरी धाड टाकली. त्याला सट्टेबाजी करताना रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयस्वालचा साथीदार प्रवीण नावाचा दुसरा आरोपी त्याला सहकार्य करीत होता. पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल करून जयस्वालला अटक करण्यात आली आहे.

...............

Web Title: Crime Branch raids on cricket betting