गुन्हे शाखेने दोन तडीपारास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:21 IST2020-12-04T04:21:00+5:302020-12-04T04:21:00+5:30
---------------- महिलेची पर्स हिसकावून नेली नागपूर : धरमपेठ येथील लक्ष्मीभवन चौकात एका महिलेची पर्स चोरट्यांनी हिसकावून नेली. धरमपेठ येथील ...

गुन्हे शाखेने दोन तडीपारास पकडले
----------------
महिलेची पर्स हिसकावून नेली
नागपूर : धरमपेठ येथील लक्ष्मीभवन चौकात एका महिलेची पर्स चोरट्यांनी हिसकावून नेली. धरमपेठ येथील रहिवासी असलेल्या नंदिता प्रमोद माने या मंगळवारी सायंकाळी पायी घरी जात होत्या. लक्ष्मीभवन चौकात एका बाईकवर आलेल्या डबलसीट युवकाने नंदिता यांची पर्स हिसकावून नेली. पर्समध्ये रोख रक्कम, माेबाईल, दस्तावेजसह ११ हजार रुपये किमतीच्या वस्तू होत्या. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
--------------------------
वीज ट्रान्सफार्मरमधून ऑईल चोरी
नागपूर : हिंगणा येथे चोरट्यांनी वीज ट्रान्सफार्मरमधून ९० हजार रुपये किमतीचे ऑईल लंपास केले. हिंगण्यातील गुमगाव येथे वीज ट्रान्सफार्मर लागले आहे. ३० नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात आरोपींनी ९० हजार रुपये किमतीचे १६० लिटर ऑईल चोरून नेले. आठवडाभरातील ट्रान्सफार्मरमधून ऑईल चाेरीची ही तिसरी घटना आहे.