क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड
By Admin | Updated: April 26, 2015 02:32 IST2015-04-26T02:32:31+5:302015-04-26T02:32:31+5:30
शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या बैरामजी टाऊन सदर येथील एका पॉश फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर शनिवारी पोलिसांनी धाड टाकली.

क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड
नागपूर : शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या बैरामजी टाऊन सदर येथील एका पॉश फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर शनिवारी पोलिसांनी धाड टाकली. या अड्ड्यावरून पोलिसांनी फ्लॅटचा मालक फिरोज, अजीज अली मो. फलतानी (२८) रा. सिकंदराबाद, दानिश सलीम दमानी (२०) रा. सिकंदराबाद, उमेद गुलाम सदानी (३९) हैदराबाद यांना अटक केली आहे.
या अड्ड्याचे मुख्य सूत्रधार हैदराबादशी संबंधित असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी बैरामजी टाऊन साई ललिता अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०७ मध्ये धाड टाकली. तेव्हा फ्लॅटमध्ये क्रिक्रेट सट्ट्याची खायवाडी सुरु होती. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत शनिवारी मुंबई आणि हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यात सट्टा खायवाडीसाठी मोठ्या प्रमाणावर हैदराबाद येथील सट्टेबाजांची चमू नागपुरात पोहोचली होती.
परंतु योजनेनुसार ठाणेदार रफीक बागवान यांच्या नेतृत्वातील चमूने सायंकाळी ५.१५ वाजता फ्लॅटवर धाड टाकली. या धाडीत लॅपटॉप आणि मोबाईलवर खायवाडी करतांना आरोपी आढळून आले. पोलिसांनी अड्ड्यातून एक एलईडी टीव्ही, १३ मोबाईल, १ लॅपटॉप, १ सेटटॉप बॉक्स, चॉर्जरसह १ लाख ७ हजार रुपयाचे साहित्य जप्त केले.