क्रिकेटपटू मोना मेश्रामचा आज एसजेएएनतर्फे सत्कार
By Admin | Updated: May 25, 2017 01:52 IST2017-05-25T01:52:17+5:302017-05-25T01:52:17+5:30
भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची अष्टपैलू खेळाडू मोना मेश्राम हिचा स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन) आज गुरुवारी दुपारी १२ वाजता सत्कार करण्यात येत आहे.

क्रिकेटपटू मोना मेश्रामचा आज एसजेएएनतर्फे सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची अष्टपैलू खेळाडू मोना मेश्राम हिचा स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन) आज गुरुवारी दुपारी १२ वाजता सत्कार करण्यात येत आहे. महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते तसेच मनपा क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम विवेकानंदनगर येथील एसजेएएन कार्यालयात होईल. मोना ही इंग्लंडमध्ये २४ जूनपासून आयोजित विश्वचषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघातून खेळणार आहे. द.आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या चौरंगी क्रिकेट मालिकेत विजेत्या भारतीय संघासाठी मोनाने शानदार कामगिरी केली होती.