क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड
By Admin | Updated: April 18, 2016 05:12 IST2016-04-18T05:12:31+5:302016-04-18T05:12:31+5:30
गुन्हे शाखा पोलिसांनी सीताबर्डी येथे सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकून तीन आरोपींना अटक केली.

क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड
नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी सीताबर्डी येथे सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकून तीन आरोपींना अटक केली.
कपिल ऊर्फ सुन्नू अशोक उपाध्याय (२६), नीरज अशोक अग्रवाल (३१) आणि संदीप गिरीश उपाध्याय (३१) बुरड गल्ली सीताबर्डी, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार पंकज मेहाडिया फरार आहे. अग्रवाल सीताबर्डी येथील बुरड गल्लीत राहतो. पोलिसांना त्याच्या घरात क्रिकेट सट्टा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी शनिवारी रात्री अग्रवाल याच्या घरी धाड टाकली तेव्हा आरोपी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात लायन्स दरम्यान सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात खायवाडी करताना आरोपी सापडले. त्यांच्याजवळून लॅपटॉप, चार मोबाईल, टीव्ही, पेन ड्राईव्ह सापडले. कपिलने मेहाडियाच्या सांगण्यावरून सट्टेबाजी करीत असल्याची माहिती दिली. मेहाडिया व्यापारी आहे. धाड टाकल्यापासून तो फरार आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त रंजन कुमार शर्मा, निरीक्षक अनिल कातकडे, एपीआय प्रमोद सानप, एएसआय राजकुमार देशमुख, हवालदार अफसर खान, लक्ष्मण शेंडे, नायक शिपाई शारदा सिंह यांनी केली.(प्रतिनिधी)