क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड

By Admin | Updated: August 10, 2015 02:34 IST2015-08-10T02:34:37+5:302015-08-10T02:34:37+5:30

परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने जरीपटक्यातील एका क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड घालून एका परप्रांतिय बुकीसह १० जणांना जेरबंद केले.

Cricket betting at the base | क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड

क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड

लॅपटॉप, मोबाईल जप्त : १० बुकी जेरबंद
नागपूर : परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने जरीपटक्यातील एका क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड घालून एका परप्रांतिय बुकीसह १० जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईलसह सट्ट्याचा पाना जप्त करण्यात आला.
हिरा नगरातील रमेश नानवानीच्या घरात संजय कलवानी क्रिकेट सट्ट्याचा अड्डा चालवतो, अशी माहिती कळताच परिमंडळ चारचे उपायुक्त ईशू सिंधू यांचे पथक आज दुपारी ४ च्या सुमारास तेथे पोहचले. मात्र, मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याचे पाहून पोलीस चक्रावले. मात्र, खबर पक्की असल्याचे ‘टिपर‘कडून कळताच पोलिसांनी बाजूच्या इमारतीवरून नानवानीच्या घराचा वरचा माळा गाठत अड्डयावर धडक दिली. तेथे हरी टेकचंद केवलरामानी (वय ३३, रा. गुरुनानक कॉलनी), शेख इरफान शेख कदीर (वय २८, रा. आशीर्वादनगर सक्करदरा), चेतन भीकूलाल मालू (वय २७, रा. शांतिनगर लकड़गंज), सूरज नर्मदाप्रसाद शुक्ला (वय २५, रा. परेदशी तेलीपुरा बजरिया) चेतन सुरेश बांगरे (वय २६, रा. बोरकर चौक कामठी), अनिल तिलकराम गुजर (वय २५, हीरानगर जरीपटका), राहुल हर्षद सोनी (वय २१, रा. छापरूनगर, लकडगंज), तरुण शिवदयाल आमलानी (वय २८, रा. सिंधी कॉलनी, दुर्ग), संजय रमेश कलवानी (वय ३४, रा. मंगळवारी बाजार, जरीपटका) आणि भूपेश अशोक जग्गी (वय ४१, गुरुनानकपुरा पांचपावली) हे सर्व जण भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर खयवाडी करताना आढळले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप अन् काही रोख रक्कमही जप्त केली. बुकींसोबत घरमालकावरही गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
सर्वात मोठी कारवाई
एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुण्या अड्ड्यावर बुकी पकडल्याची ही दोन तीन वर्षातील पहिलीच कारवाई आहे. त्यात छत्तीसगडचाही बुकी हाती लागल्यामुळे नागपुरातील बुकींचे परप्रांतिय कनेक्शन पुन्हा एकदा उघड झाले आहे. लोकमतने नागपुरातील बुकीचे देशविदेशातील बुकीचे कनेक्शन आणि कोट्यवधींच्या उलाढालीचे वृत्त वेळोवेळी प्रकाशित केले आहे, हे विशेष !

Web Title: Cricket betting at the base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.